भंडारी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंडारी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 
विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
भंडारी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

भंडारी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

L२१५२५

मालवण ः येथील भंडारी हायस्कूलच्या १९९०-९१ च्या दहावीच्या बॅचच्या गेट टूगेदरला उपस्थित माजी विद्यार्थी, शिक्षक वर्ग.

भंडारी हायस्कूलच्या माजी
विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : येथील भंडारी ए. सो. हायस्कूलच्या १९९०-९१ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर पार पडले. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
यावेळी माजी पर्यवेक्षक रवींद्र वराडकर, माजी शिक्षक जयवंत ढोलम, वडाचापाट हायस्कूलचे मुख्याध्यापक जे. एन. पाटील, भंडारी हायस्कूलचे पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सदानंद पाटकर, प्रकाश कदम, ध्रुवकुमार राणडे, ज्युलि फर्नांडिस, माजी मुख्याध्यापिका सुप्रिया टिकम, नेहा साटलकर आदींसह माजी विद्यार्थी सचिन पराडकर, किशोर बांदकर, पुंडलिक कदम, ममता चव्हाण, प्रवीण आंबेरकर आदी व इतर उपस्थित होते. प्रारंभी वाय. आर. राजूरकर यांनी दीपप्रज्वलन करून गेट टुगेदरचे उदघाटन केले तर स्वागत किशोर बांदकर यांनी केले. यावेळी श्री. राजूरकर यांनी तुम्ही चांगले समाजाला दिले तर समाजही त्याची परतफेड चांगल्या पद्धतीने करतो आणि यातूनच आपला विकास घडतो आनंद हा कधी सहज आणि आपोआप मिळत नाही तर त्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न करावे लागतात. या गेट टुगेदरच्या माध्यमातून सचिन पराडकर, किशोर बांदकर, प्रवीण आंबेरकर, पुंडलिक कदम यासारखे आणि तुम्ही सर्वांनी मिळून जे प्रयत्न केले त्यामुळे हे गेट टुगेदर आनंददायी वातावरणात संपन्न होत आहे. यावेळी उपस्थित माजी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सुजाता शेलटकर, ममता चव्हाण, पुंडलिक कदम यांचा तसेच माजी शिक्षकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सचिन पराडकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन पुंडलिक कदम, बबन मालवणकर यांनी केले. या गेट टुगेदर कार्यक्रमास २८ माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.
-------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57804 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top