टंचाईग्रस्तांची तहान भागवणारी चोरद नदी दूषित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टंचाईग्रस्तांची तहान भागवणारी चोरद नदी दूषित
टंचाईग्रस्तांची तहान भागवणारी चोरद नदी दूषित

टंचाईग्रस्तांची तहान भागवणारी चोरद नदी दूषित

sakal_logo
By

rat13p4.jpg
21478
खेडः चोरद नदीपात्रात वाहने धुताना स्थानिक वाहनचालक. (सिद्धेश परशेट्ये ः सकाळ छायाचित्रसेवा)
-------------

टंचाईग्रस्तांची तहान भागवणारी चोरद नदी दूषित
ग्रामस्थांमधून संताप; प्रशासनाकडून कारवाईची मागणी
खेड, ता. १३ः तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची तहान भागवणाऱ्या खेड-आंबवली मार्गावरील चोरद नदीपात्रात जनावरे, वाहने आणि कपडे धुतले जात असल्याने नदीचे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना टँकरद्वारे पुरवले जात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. ज्या डोहातून टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा केला जातो त्या डोहात जनावरे, वाहने आणि कपडे धुणाऱ्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी टंचाईग्रस्त ग्रामस्थांनी केली आहे.
टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या घशाला पडलेले कोरड शमवण्यासाठी पंचायत समिती स्तरावर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. ग्रामस्थांच्या मागणीनुसार नियोजन करून टंचाईग्रस्त गावांकडे टँकर धावू लागतो. खेड-आंबवली मार्गावरील चोरद नदीच्या डोहातील पाणी हे पाणीटंचाई ग्रामस्थांसाठी राखीव ठेवलेले असते. फेब्रुवारी महिन्ह्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस पडेपर्यंत चोरद नदीच्या डोहातील पाणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पुरवले जाते. गेली अनेक वर्ष हे सुरूच आहे.
सद्यःस्थितीत तालुक्यातील १२ गावे आणि या गावातील वाड्यांना टंचाई झळ बसली आहे. ग्रामस्थांना यातून दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाच्यावतीने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे; मात्र हे पाणी ज्या नदीपात्रातून भरले जाते ते चोरदनदीचे पात्रच दूषित केले जात असल्याने टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

कोट
पाणी प्रदूषणाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. धनगरवाड्यामधून भीषण पाणीटंचाई आहे. धनगरवाडीतील ग्रामस्थ पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावावा. धनगरवाड्यावर यामुळे आरोग्यांचा गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यास याला प्रशासन जबाबदार राहील.
- बाबू बावदाने, देवाचा डोंगर

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57811 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top