
संगीतकार अशोक पत्कींशी सांगीतिक गप्पा
rat१३p१४.jpg-
21497
अशोक पत्की
-------------
संगीतकार अशोक पत्कींशी सांगीतिक गप्पा
चतुरंग प्रतिष्ठान ; १६ ला देवरूख, १७ ला रत्नागिरीत कार्यक्रम
रत्नागिरी, ता. १३ ः ''चतुरंग''च्या ''मुक्तसंध्या'' उपक्रमातून अनेक कलाकारांशी, मान्यवर नामवंतांशी आमने सामने सहवास-संवाद साधण्याची संधी रसिकांना बरेचवेळा मिळत असते. रत्नागिरी व देवरूखमध्ये ख्यातकीर्त संगीतकार अशोक पत्की यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. येत्या १६ आणि १७ मे रोजी हे दोन कार्यक्रम होणार असून, जास्तीत जास्त रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन चतुरंग प्रतिष्ठानने केले आहे.
देवरूख येथे ''अभिरुची'' संस्थेच्या सहकार्याने १६ मे रोजी सायं. ६.३० वा. लक्ष्मीमंगल कार्यालयात कार्यक्रम होणार आहे. तसेच रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत वाचनालयाच्या सभागृहात १७ मे रोजी सायं. ६ वा. कार्यक्रम रंगणार आहे. सुमारे ५० वर्षांच्या कारकीर्दीत शेकडो चित्रपट-नाटकांना संगीत दिलेल्या, शेकडो जिंगल्स लोकप्रिय केलेल्या आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी अनेक मालिकांची शीर्षकगीते संगीतबद्ध केलेल्या संगीतसम्राट अशोजींना साक्षात अनुभवण्याची, जाणून घेण्याची संधी देवरूख आणि रत्नागिरीवासीयांना मिळणार आहे.
पत्कींच्या संगीतसाधनेतील वेगळेपणाची ओळख सांगणारा, अनेक बहुरंगी-बहुढंगी अनुभवांनी सजलेला आणि स्वररचनांमागील औत्सुक्याचा, वेगळेपणाचा सहस्त्रचंद्रदर्शनी प्रवास आपल्याला या सांगीतिक गप्पांमधून अनुभवता, जाणून घेता येणार आहे. त्यांच्याशी सुसंवाद साधत त्यांना बोलतं करणार आहेत. चिपळूण येथील अभ्यासू निवेदिका मीरा पोतदार-देवरूख, रत्नागिरी आणि परिसरातील रसिकांनी संगीतप्रेमी रसिक मित्रमंडळींसह उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन चतुरंग प्रतिष्ठान परिवार, अभिरुची संस्था आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57812 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..