देवरूख ग्रामीण रुग्णालयाचा चौथा मजला रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवरूख ग्रामीण रुग्णालयाचा चौथा मजला रद्द
देवरूख ग्रामीण रुग्णालयाचा चौथा मजला रद्द

देवरूख ग्रामीण रुग्णालयाचा चौथा मजला रद्द

sakal_logo
By

rat13p17.jpg
21494
देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे सुरू असलेले काम.
-------------
देवरूख रुग्णालयाचा
चौथा मजला रद्द
प्रस्तावित कार्यालये उपलब्ध जागेत हलवा
साडवली, ता. १३ ः देवरूख शहराचा वाढता विस्तार पाहता देवरूखमधील तसेच इतर गावातील नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी देवरूख ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव दहा वर्षापूर्वी डॉ. प्रल्हाद देवकर यांनी पाठवला होता. कालांतराने तो आराखडा मंजूर झाला व थ्री प्लस वन इमारत उभी राहील, असे जाहीर करण्यात आले. गेल्या तीन वर्षापूर्वी ग्रामीण रुग्णालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू झाले. सध्या या इमारतीचे काम सुरूच असून चौथा मजला रद्द झाल्याची बाब समोर आली आहे.
जिल्हा परिषदेचे अधीक्षक अभियंता यांच्या सूचनेवरून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील प्रस्तावित बांधकाम रद्द करून प्रस्तावित कार्यालये इतर मजल्यावर उपलब्ध जागेत समाविष्ट करावीत, असे आदेश दिले गेले आहेत. यामुळे चौथा मजला झाला नाही तर नवी इमारत होऊनही चांगल्या सुविधा देणे शक्य होणार नाही. बऱ्याच वर्षानंतर आरोग्यासाठी चांगली इमारत होत असेल तरच त्याचा रुग्णांना फायदा होणार आहे. भविष्यकाळात या इमारतीचे वाढीव काम होईल की नाही याबाबत शंका घेण्यात येत आहे. या नवीन आराखड्याप्रमाणे कॉम्फरन्स हॉल पहिल्या मजल्यावर, बालरोग विभागासमोर नियोजित केले आहे, तर कार्यालय व्ही. सी. रुम व स्टोअर रुम हे दुसऱ्या मजल्यावरील पुरुष रुग्णविभाग कक्षासमोर नियोजित केले आहे. हे असे असल्यामुळे अधिकारी कर्मचारी व कामासाठी येणारे नागरिक यांना जंतूसंसर्ग होऊन आरोग्याविषयी धोका निर्माण होऊ शकतो. चौथ्या मजल्यावर कार्यालय, भांडारगृह, वैद्यकीय अधीक्षक यांचे दालन, व्ही. सी. रूम, विविध शिबिरे व मेळावे यासाठी कॉन्फरन्स हॉल, असे नियोजित होते. चौथा मजला झालाच नाही तर हे विभाग कुठे होणार, असा प्रश्न पडला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57813 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top