
साखरपा येथे काजळीतील गाळ उपशाला प्रारंभ
-rat13p20.jpg
L21506
साखरपाः गाळ उपसा करण्यासाठी आणलेला जेसीबी.
-------------
काजळीतील गाळ उपशाला प्रारंभ
साखरप्यात नामची मोठी मदत; अतिवृष्टीमुळे नदीपात्रात पुन्हा गाळ
साखरपा, ता. १३ः साखरपा येथील काजळी नदीच्या गाळउपशाला पुन्हा एकदा प्रारंभ झाला आहे. मागील वर्षी झालेल्या अतीवृष्टीमुळे नदीपात्र पुन्हा एकदा गाळाने भरले होते.
मागील वर्षी काजळीनदीच्या गाळउपशाचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले होते. नाम फाउंडेशन, दत्त देवस्थान आणि दत्तसेवा पतसंस्था तसेच कोंडगाव ग्रामपंचायत यांच्यावतीने लोकसभागातून बाजारपेठेलगत असलेल्या नदीपात्रातून गाळ काढण्याचे काम केले होते. त्यामुळे काजळीनदीने मोकळा श्वास घेतला होता; पण गेल्या वर्षी जुलै महिन्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे नदीपात्र गाळाने पुन्हा भरले. विशेषत: या पात्रातील डोह आणि कोंडी पुन्हा भरून गेल्या. हा गाळ उपसा करण्याचे काम पुन्हा एकदा हाती घेण्यात आले आहे. यासाठी नाम फाउंडेशनने मोठी मदत देऊ केली असून कोंडगाव ग्रामपंचायत आणि लोकसहभागातून हे काम हाती घेण्यात आल्याचे व्यापारी संघटचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57815 Txt Ratnagiri Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..