सांगवेतील श्री साईमंदिराचा ११वा वर्धापनदिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सांगवेतील श्री साईमंदिराचा ११वा वर्धापनदिन
सांगवेतील श्री साईमंदिराचा ११वा वर्धापनदिन

सांगवेतील श्री साईमंदिराचा ११वा वर्धापनदिन

sakal_logo
By

सांगवेत आज
मंदिर वर्धापन
साडवलीः देवरूखनजीकच्या सांगवे गावातील श्री साईमंदिराचा ११वा वर्धापनदिन शनिवारी (ता. १४) विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. सांगवे समाजसेवा संघ, मुंबई व सांगवे ग्रामस्थांच्यावतीने हा सोहळा होणार आहे. सकाळच्या सत्रात पूजा, अभिषेक, भंडारा होणार आहे. नंतर स्मरणिका प्रकाशन सोहळा, नेत्रचिकित्सा शिबिर होणार आहे. रात्री ८ वाजता रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. आमदार शेखर निकम, उद्योजक सुरेश कदम, प्रकाश गंगवाणी आदी उपस्थित रहाणार आहेत. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन विलास शेलार, प्रदीप शेलार, दिलीप शेलार, देवदत्त शेलार, दिंगबर शेलार यांनी केले आहे.
-----------
किशोर मुले, मुलांसह
पालकांसाठी कार्यशाळा
रत्नागिरी : किशोरावस्थेतील मुला-मुलींसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवारी (ता. १५) कारवांचीवाडी येथील मायक्रोडायग्नोसीस हेल्थ सेंटर येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मुलांसाठी कार्यशाळा व पालकांसाठी चर्चासत्र ६ ते ७ या वेळेत होणार आहे. यामध्ये मानसशास्त्रज्ञ बालरोगतज्ज्ञ व शिक्षण अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. प्रश्न तुमचे उत्तर माझे चर्चासत्रातून शंकानिरसन करण्यात येणार आहे. यामध्ये कृतीयुक्त उपक्रम व प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी सुखदा सारोळकर व अतुल कामत यांच्याशी संपर्क साधावा.
-----------
पेवे-गवळवाडीत
वृक्ष वाटप
गुहागरः तालुक्यातील पेवे गवळवाडी येथे ग्रामस्थांना वृक्ष वाटप करण्यात आले. सार्वजनिक सत्यनारायण महापूजेनिमित्त हा पर्यावरण संतुलनाकरिता विधायक उपक्रम येथील गोपाळकृष्ण विकास मंडळाच्या वतीने राबविण्यात आला. याप्रसंगी विविध स्पर्धा, शालेय विद्यार्थी गुणगौरव, संतोष पवार यांचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वरदान हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. हासबे यांचे अंधश्रद्धा निर्मुलनविषयी व्याख्यान, सत्कार, नृत्य स्पर्धा व सामूहिक गरबा आयोजित करण्यात आला होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57818 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top