संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

विलवडेत आज
क्रिकेट स्पर्धा
बांदा ः राजा शिवाजी विद्यालय, विलवडेच्य‍ा ‘माजी विद्यार्थी संघटना पंचक्रोशी’ संघटनेच्या माध्यमातून ‘भव्य क्रिकेट स्पर्धेचे’ आयोजन उद्या (ता.१४) हायस्कूलच्या पटांगणावर केले आहे. हायस्कूलमध्ये पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना वेळेत जाणे-येणे सोयस्कर होण्यासाठी वाहन खरेदीसाठी निधी सकलंन करण्याचे काम या संघटनेने हाती घेतले आहे. यासाठी हायस्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी ५० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याचे संघटनेचे सचिव रुपेश परशुराम परब यांनी सांगितले. निधी संकलनास मदत होईल या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले आहे. प्रशाळेचे माजी विद्यार्थीच स्पर्धेत सहभाग घेऊ शकतात. उच्च पदावर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थीच्या हस्ते उद्या सकाळी नऊला हायस्कूलच्या पटांगणावर स्पर्धेचे उद्‍घाटन होणार आहे. गोपाळ दळवी यांच्याशी संपर्क साधावा.

‘तो’ गतिरोधक
काढण्याची मागणी
सिंधुदुर्गनगरी ः डॉन बॉस्को स्कूल ते मालवण हायवे दरम्यान रानबांबूळी येथे घातलेला गतिरोधक २३ मेपर्यंत काढून टाकावा, अशी मागणी हार्दिक कदम यांनी उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम उपविभाग कणकवली यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ओरोस डॉन बॉस्को स्कूल ते मालवण हायवे दरम्यान रानबांबूळी येथे घालण्यात आलेला गतिरोधकामुळे अपघात होण्याची शक्यता असून याबाबत वारंवार निवेदने देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे २३ मेपर्यंत हा गतिरोधक काढून टाकण्यात यावा. अन्यथा २४ मेस आंदोलन करू, असा इशारा कदम यांनी दिला आहे.

वडाचापाटला
आरोग्य शिबिर
मालवण : तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट, सिद्धार्थ मंडळ वडाचापाट यांच्यावतीने व जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने सोमवारी (ता.१६) सकाळी नऊ ते बारा दरम्यान वडाचापाट समाजमंदिर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. तरी या शिबिरात ग्रामस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा गाव शाखा वडाचापाट व सिद्धार्थ मंडळ वडाचापाट यांच्यावतीने केले आहे.

भोगवे-शेळपीत
उद्या महोत्सव
वेंगुर्ले ः जिल्हा परिषद शाळा भोगवे-शेळपी येथे रविवारी (ता.१५) अमृत महोत्सव कार्यक्रम होणार आहे. यानिमित्त सकाळी आठला सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, दुपारी अडीचला हळदीकुंकू, भजने, सायंकाळी सव्वाचारला अमृत महोत्सव उद्‍घाटन, शिक्षक सत्कार, विद्यार्थी गुणगौरव, रात्री साडेनऊला पारंपरिक लोककला, साडेदहाला अमृतनाथ सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचे नाटक होणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याध्यापक झिलू गोसावी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57823 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top