रेडकर रिर्सचला संशोधनासाठी परवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेडकर रिर्सचला संशोधनासाठी परवानगी
रेडकर रिर्सचला संशोधनासाठी परवानगी

रेडकर रिर्सचला संशोधनासाठी परवानगी

sakal_logo
By

रेडकर रिर्सचला संशोधनासाठी परवानगी
रविकिरण तोरसकर ः इथिकल कमिटीची भुमिका महत्वाची

सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १३ : येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर यांच्या हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या इथिकल कमिटीला वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी भारत सरकारच्या ड्रग कंट्रोलर जनरल यांनी परवानगी दिली आहे, अशी माहिती सेंटरचे विश्वस्त रविकिरण तोरसकर यांनी दिली.

संशोधनाच्या प्रमाणीकरणासाठी इथिकल कमिटीची भुमिका अत्यंत महत्वाची ठरते. वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन करताना त्याचे निकष ठरविणे महत्वाचे असते. संशोधनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याची पडताळणी होते. प्रत्येक संशोधनाचे सर्व रेकॉर्ड नियमाप्रमाणे जतन करणे व त्यांचे प्रमाणीकरण करणे आवश्यक असते. या सर्व गोष्टींचे नियमन करण्याचे काम इथिकल कमिटीकडून केले जाते. वैद्यकीय क्षेत्रात नव्याने येणारी त्याचप्रमाणे वापरात असलेल्या जुन्या औषधांचे वारंवार परीक्षण होत असते. नवीन औषधांचे रुग्णांवर होणारे परिणाम तपासण्यासाठी होणाऱ्या ड्रग्ज ट्रायल्समध्ये इथिकल कमिटीची भुमिका अत्यंत महत्त्वाची असते. इथिकल कमिटीच्या मान्यतेशिवाय अशा कोणत्याही संशोधनास अधिकृत करता येत नाही. त्यामुळे केंद्र सरकारने रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या इथिकल कमिटीला दिलेली मान्यता फारच महत्वाची ठरते.

गेल्या काही वर्षांत डॉ. विवेक रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर रेडकर व त्यांच्या वैद्यकीय पथकाने अनेक संशोधन प्रबंध देश विदेशात सादर केले. अमेरिकन डायबेटिक असोसिएशन, युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, ट्रॉपिकल मेडिसीन, ऑस्ट्रेलियन मेडिकल असोसिएशन अशा नावाजलेल्या संघटनांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या सर्व ठिकाणी त्यांनी आपले स्वत:चे मूळ संशोधन प्रबंध सादर केले आहेत. डॉ. विवेक रेडकर यांनी आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानीसारख्या बिगर ऍलोपॅथिक वैद्यकिय शाखांच्या डॉक्टरांना व्हेंटिलेटरचे योग्य ज्ञान देण्याची गरज व्यक्त केली. मेडिकल वॉरियर्सची दुसरी फळी उपलब्ध करुन देण्यासाठी मार्गदर्शन करणारा प्रबंध आयुषचे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे सादर केला होता. केंद्र सरकारने त्याची दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी त्याला मान्यता दिली. मेडिकल वॉरियर्सच्या दुसऱ्या फळीची आवश्यकता लक्षात घेऊन आयुष मंत्रालयाला तशा सुचना दिल्या.
गेल्या पंधरा वर्षात वेगवेगळ्या १४ देशांमध्ये त्यांनी विविध विषयांवरील वैद्यकीय संशोधनात्मक प्रबंध सादर केले आहेत. त्यांचा covid ट्रीटमेन्ट वरील methylene blue वरील संशोधनाचे प्रबंध इटली व अमेरिका या दोन्ही देशात निवडले गेले व सादर केले. या सर्व संशोधन कार्याची दखल घेत केंद्र सरकारने रेडकर हॉस्पिटलमधील इथिकल कमिटीला मान्यता दिली आहे. विविध औषध कंपन्यांना त्यांच्या नवीन औषधांच्या डबल ब्लाईंड ट्रायल्स तसेच औषधांच्या होणाऱ्या दूरगामी परिणामांच्या चाचण्या व त्या अनुषंगाने होणारे संशोधन आता कोकणात होऊ शकेल.
केंद्राच्या ड्रग कंट्रोलर जनरल यांनी अधिकृत केलेल्या रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या या इथिकल कमिटीमध्ये चेअरपर्सन म्हणून डॉ. विजयकुमार पाटील, डॉ. रुफिनो मॉन्टेरो, डॉ. सुप्रिया निरसे पाटील, गंगाराम मोरजकर, योगेश भिडे, डॉ. दर्शन खानोलकर तसेच डॉ. रामचंद्र चव्हाण यांची होमीओपथी व आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली आहे. अशी माहितीही श्री. तोरसकर यांनी दिली.
------------


कोकणातील ऍलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्या डॉक्टरांना आता डॉ. रेडकर हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या मान्यताप्राप्त इथिकल कमिटीच्या माध्यमातून आपण केलेले वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन थेट राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडणे सहज शक्य होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील आय. सी. एम. आर. सारख्या अनेक शिखर संस्थांमध्ये आपले संशोधन थेटपणे मांडता येणे आता कोकणातील संशोधक डॉक्टरांना शक्य होणार आहे.
- रविकिरण तोरसकर
------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57826 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top