सिंधुदुर्गात मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिंधुदुर्गात मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदरात वाढ
सिंधुदुर्गात मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदरात वाढ

सिंधुदुर्गात मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदरात वाढ

sakal_logo
By

मुलांपेक्षा मुलींच्या जन्मदरात वाढ

‘आरोग्य’चा अहवाल; चार महिन्यांत तुलनेत ४४ मुली जास्त

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यात जन्मलेल्या एकूण १९९४ नवजात बालकांमध्ये मुलांपेक्षा ४४ मुली अधिक जन्मल्याच्या इतिहास घडला आहे. मुलगे ९७५ तर मुली १०१९ एवढ्या जन्मल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या एका वर्षाच्या कालावधीमध्ये ६ हजार २८० बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये ३ हजार २१६ मुलगे तर ३ हजार ०६४ मुलीचा समावेश आहे. या वर्षभरामध्ये जन्मलेल्या बालकांमध्ये मुलगे व मुलींच्या जन्माचे प्रमाण पाहता मुलांच्या जन्मापेक्षा १५२ एवढ्या मुली कमी जन्मल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गतवर्षी जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत एकूण ७२५५ एवढ्या नवजात बालकांचा जन्म झाला होता. जानेवारी २०२१ ते डिसेंबर २०२१ या वर्षात ६२८० नवजात बलकांचा जन्म झाला आहे. ९७५ एवढी बालके कमी जन्मली आहेत. यावरून जिल्ह्याच्या जन्मदर घटल्याचे स्पष्ट होत आहे. २०२० मध्ये ३७९२ मुलगे व ३४६४ मुलींचा जन्म झाला होता. २०२१ मध्ये ३२१६ मुलगे व ३०६४ मुली जन्मल्या आहेत. २०२० या वर्षीच्या तुलनेत ९७५ एवढी बालके कमी जन्मली असून मुलांपेक्षा केवळ १५२ एवढयाच मूली कमी जन्मल्याचे दिसून येत असून २०२० च्या तुलनेत २०२१ मध्ये मुलींच्या जन्म प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यात ९७५ मुलगे व १०१९ मुलीं अशा एकुण १९९४ नवजात बालकांचा जन्म झाला आहे. यामध्ये मुलांपेक्षा ४४ एवढया मुली अधिक जन्मल्या असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात मुलींच्या जन्माबाबत जनजागृती केली जात आहे. प्रशासन व जनतेकडूनही मुला-मुलींचे स्वागत होऊ लागले आहे. विविध उपाययोजना, शासकीय योजनेचा लाभ मुलींच्या जन्मानंतर दिले जात आहेत. तरी मुलींच्या जन्माचे प्रमाण मुलांच्या जन्मप्रमाणाशी बरोबरी करू शकले नव्हते; मात्र जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यामध्ये जन्मलेल्या एकुण १९९४ नवजात बालकामध्ये ४४ एवढ्या मुली अधिक जन्मल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील मुलींचे जन्मप्रमाण इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक राहिले आहे. मुलीचे जन्म प्रमाण वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२१ या एका वर्षाच्या काळात ६ हजार २८० बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये ३ हजार २१६ मुलगे तर ३ हजार ०६४ मुलीचा समावेश आहे.


महिना-मुलगे-मुली-एकूण
जानेवारी-२५३-२३७-४९०
फेब्रुवारी-२३८-२२५-४६३
मार्च-२२६-२१६-४४२
एप्रिल-२५७-२५४-५११
मे-२४९-२४४-४९३
जून-२२८-२३२-४६०
जुलै-२६०-२५३-५१३
ऑगस्ट-२५०-२५१-५०१
सप्टेंबर-२७८-२९७-५७५
ऑक्टोबर-३३४-२६८-६०२
नोव्हेंबर-३२८-३१२-६४०
डिसेंबर-१५-२७५-५९०

चार महिन्यांत ४४ मुली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिल २०२२ या चार महिन्यामध्ये जन्मलेल्या एकूण १९९४ बालकांमध्ये जानेवारी २४१ मुलगे, २७५ मुली, फेब्रुवारी २२६ मुलगे, २२२ मूली, मार्च २५९ मुलगे, २८१ मूली, एप्रिलमध्ये २४९ मुलगे व २४१ मूली अशा एकुण १९९४ नवजात बालकांचा जन्म झाला असून त्यामध्ये ४४ मुली अधिक जन्मल्या आहेत.

प्रभावी योजना
जिल्ह्यात मुलामुलींचे प्रमाण समतोल राखण्यासाठी तसेच मुलगा व मुलगी हे एक समान आहेत हे पटवून देण्यासाठी पथनाट्य, प्रचार, प्रबोधन असे अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मुलगी जन्माला आल्यास शासनाकडून अनेक योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे मुलगाच पाहिजे ही मानसिकता बर्‍याच अंशी कमी झाली असल्याचे दिसून येते. एक दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्यांचे प्रमाणही जिल्ह्यात वाढताना दिसत आहे.


जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबवितानाच भ्रूणहत्या रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून कायद्याचा धाक आणि कठोर पावले उचलली जात असल्याने मुलींचे जन्म प्रमाण वाढत असल्याचे दिसत आहे. ही बाब समाधानकारक असून चांगल्या कामाचे फलित सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिसू लागले आहे.
- डॉ. महेश खलिपे, जिल्हा आरोग्य अधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57833 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top