
परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे
L२१५३७
ओरोस ः जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या कौतुक सोहळ्यात बोलताना आमदार वैभव नाईक.
परिचारिकांचे योगदान महत्त्वाचे
वैभव नाईक ः ओरोस रुग्णालयात कृतज्ञता सोहळा
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः नर्सिंग ही खऱ्या अर्थाने ईश्वर व देशसेवा आहे. कोरोना काळात जिल्ह्यातील परिचारिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून डॉक्टरांसमवेत दिलेल्या सेवेमुळे हजारोंचे प्राण वाचू शकले, अशा शब्दात आमदार वैभव नाईक यांनी येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्या कामगिरीचे कौतुक केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
जागतिक परिचारिका दिनानिमित्त ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांच्यावतीने खास कौतुक सोहळ्याचे आयोजन केले होते. याचे उद्घाटन आमदार नाईक यांनी केले. यावेळी प्रमुख प्रमुख अतिथी म्हणून शेखर सामंत, जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभाग प्रमुख डॉ. जोशी व जिल्हा रुग्णालयाच्या मेट्रन श्रीमती वसावे सिस्टर उपस्थित होत्या. या प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
सामंत यांनी देखील या परिचारिकांनी कोरोना काळात समर्पित भावनेतून दिलेल्या सेवेचे कौतुक केले. या सेवेमुळे हजारो रुग्णांचे व त्यांच्या नातेवाईकांचे आशीर्वाद त्यांना मिळाल्याचे ते म्हणाले. अशीच सेवा या पुढेही जनतेला मिळत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर आमदार नाईक यांच्या कार्याबद्दल त्यांनी गौरोद्गार काढताना जिल्हा रुग्णालयाच्या परिचारिका तृप्ती पुजारे कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अनेक अडचणी आल्या असता आमदार नाईक यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांना धीर देत मदतकार्य केल्याची आठवण यावेळी सामंत यांनी करून दिली. यावेळी कोरोना काळात उत्तम कामगिरी बजावलेल्या परिचारिकांचा आमदार नाईक, श्री. सामंत, डॉ. जोशी व मेट्रन वसावे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यापुढेही मदत करू
यावेळी आमदार नाईक म्हणाले, ‘‘पुढील वर्षापासून जिल्हास्तरावर एकत्र व मोठ्या स्वरुपात कार्यक्रम आयोजित करण्याची संकल्पना मांडून त्यासाठी आपली सर्वतोपरी मदत राहील.’’
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57838 Txt Sindhudurg Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..