बावशी रस्त्याबाबत उपोषणाचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बावशी रस्त्याबाबत उपोषणाचा इशारा
बावशी रस्त्याबाबत उपोषणाचा इशारा

बावशी रस्त्याबाबत उपोषणाचा इशारा

sakal_logo
By

रस्त्याबाबत
उपोषणाचा इशारा
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः बावशी तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्त्याची आणलेली २३ नंबरची नोंद रद्द व्हावी, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतीने गट नंबर २५१ व २५२ मधून रस्ता करू नये. दखल न घेतल्यास २३ मे पासून तोंडवली बावशी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा पुंडलिक आत्माराम मर्ये यांनी दिला असून तसे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बावशी-तेलीवाडी ते बावशी मुख्य रस्त्यासाठी तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे; मात्र हा रस्ता बनविताना ग्रामपंचायतीने अनेक नियम धाब्यावर बसवून रस्त्याचे काम पूर्ण असल्याचे दाखविले आहे. या ग्रमपंचायतीने मृत जमीनदार आणि ज्या जमिनीचा न्यायालयात वाद आहे, अशाही जमिनींची समंतीपत्रे तयार केली आहेत. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने गट नंबर २५१ आणि २५२ मधील २३ नंबरची नोंद रद्द व्हावी, न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत ग्रामपंचायतीने गट नंबर २५१ व २५२ मधून रस्ता करू नये.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57864 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top