''शिवतेज''च्या वक्तृत्व स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शिवतेज''च्या वक्तृत्व स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद 
स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद
''शिवतेज''च्या वक्तृत्व स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद

''शिवतेज''च्या वक्तृत्व स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद

sakal_logo
By

L२१५६४


- बांदा ः येथे शिवतेज सेवा संस्था आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करताना पोलीस निरीक्षक शामराव काळे. सोबत प्रकाश तेंडोलकर, रुपेश पाटील व इतर. (छायाचित्र ः निलेश मोरजकर )

''शिवतेज''च्या वक्तृत्व
स्पर्धेला बांद्यात प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १३ ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील शिवतेज सेवा संस्थेच्यावतीने शालेय व खुल्या गटात आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. उद्या (ता.१४) या स्पर्धेचे पारितोषिक वितरण सकाळी ९ वाजता जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा येथे करण्यात येणार आहे.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा ः पहिली ते चौथी गटासाठी ''छत्रपती संभाजी महाराजांचे बालपण'' हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम - सर्वज्ञ वराडकर, द्वितीय - नील बांदेकर, तृतीय - मृणाल पाटकर. पाचवी ते आठवी गटासाठी ''स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज'' हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम - श्रावणी आरावंदेकर, द्वितीय - शमिका चिपकर, तृतीय - वेदांत सावंत. नववी ते बारावी या गटासाठी ''छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धनीती'' हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम - शमिका चिपकर, द्वितीय - अलिशा पाटकर, तृतीय- अथर्व शिरसाठ. खुल्या गटासाठी ''छत्रपती संभाजी महाराज यांचे राजकारण व समाजकारण'' हा विषय ठेवण्यात आला होता. या गटात प्रथम - नेत्रा राणे, द्वितीय - शुभेच्छा सावंत, तृतीय- प्रकाश पाटील यांनी यश मिळविले. स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रकाश तेंडोलकर, रुपेश पाटील, चंद्रकांत सावंत, जयेश म्हाडगूत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण सावंत यांनी केले. प्रास्ताविक जे. डी. पाटील यांनी केले. यावेळी अक्षय मयेकर, संकेत वेंगुर्लेकर, रीना मोरजकर, प्रथमेश राणे, नारायण बांदेकर, संतोष मंझिलकर, केदार कणबर्गी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57869 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top