सामंत फॅमिली ट्रस्टतर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामंत फॅमिली ट्रस्टतर्फे
गरजू रुग्णांना आर्थिक मदत
सामंत फॅमिली ट्रस्टतर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदत

सामंत फॅमिली ट्रस्टतर्फे गरजू रुग्णांना आर्थिक मदत

sakal_logo
By

L२१५६७

सावंतवाडी ः येथे गरजूंना धनादेश प्रदान करताना डॉ. जयेंद्र परुळेकर. (छायाचित्र ः रोहन गावडे)

सामंत फॅमिली ट्रस्टतर्फे
गरजू रुग्णांना आर्थिक मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे (कै.) दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबईच्या माध्यमातून ५ गरजू रुग्ण व एका गरजू विद्यार्थिनीला आर्थिक सहकार्य करण्यात आले. डॉ. परुळेकर यांच्या हस्ते गरजूंना हा धनादेश प्रदान आला.
(कै.) दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या वतीने दरवर्षी जिल्ह्यातील गरजू रुग्ण व आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली जाते. प्रतिवर्षी प्रमाणे या वर्षी देखील ट्रस्टच्या माध्यमातून करिना महादेव शेटये (मडूरा), रुची वासुदेव वालावलकर (वालावल), माधवी महादेव परब (कोलगाव), यशवंत गणेश जाधव (कवठणी), व्यंकू राजाराम पांगुळ (पिंगुळी), बाळकृष्ण केशव मार्गी (केरवडे) या ६ गरजूंना आर्थिक मदत करण्यात आली. यात एक गरजू विद्यार्थिनी तर ५ आजाराने त्रस्त रुग्णांचा समावेश आहे. यापुढेही गरजूंना आर्थिक मदतीचे कार्य सुरु राहणार असून गरजूंनी (कै.) दिनकर गंगाराम सामंत फॅमिली चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या नावाने निवेदन अर्ज, उत्पन्नाचा दाखला, वैद्यकीय कागदपत्रे, औषधांची बिलं, हाॅस्पिटल डिस्चार्ज कार्ड, आधार कार्ड, बॅंक पासबुक, इच्छुक लाभार्थीचा घरासह फोटो, शैक्षणिक मदतीसाठी (शाळेच्या किंवा काॅलेजच्या मुख्याध्यापकांचे पत्र, प्रगती पुस्तक आणि फी थकीत असल्याची कागदपत्रे) येथील डॉ. परुळेकर यांच्या आनंद पॉलिक्लिनिक येथे सादर करावी, असे आवाहन डॉ. परुळेकर यांनी केले आहे.
-----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57878 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top