सुवर्णपालवी महोत्सवः भाताच्या 31 जाती, आंब्याच्या 150 जाती लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुवर्णपालवी महोत्सवः भाताच्या 31 जाती, आंब्याच्या 150 जाती लक्षवेधी
सुवर्णपालवी महोत्सवः भाताच्या 31 जाती, आंब्याच्या 150 जाती लक्षवेधी

सुवर्णपालवी महोत्सवः भाताच्या 31 जाती, आंब्याच्या 150 जाती लक्षवेधी

sakal_logo
By

rat१३p३०.jpg-
२१५७५
दापोलीः सुवर्णपालवी महोत्सवातील कृषी प्रदर्शनात ठेवलेली शेतीसाठीची यंत्रे.
-rat१३p३१.jpg-
२१५७६
मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या नौकांची प्रतिकृती.
-rat१३p३२.jpg-
२१५७७
कृषी प्रदर्शनात ठेवलेली विविध कंदपिके.
-rat१३p३३.jpg-
२१५७८
केळीच्या विविध जातीचे रोपे.
-rat१३p३४.jpg-
L२१५७९
कोकणातील आंब्याच्या विविध जाती.
-rat१३p३५.jpg-
२१५८०
प्रदर्शनातील मुख्य आकर्षण ठरलेली कावेरी जातीची कोंबडी.
-rat१३p३७.jpg-
L२१५८२
कृषी प्रदर्शनात बैल आणि शेळ्या आकर्षणाचे केंद्र ठरल्या.
-rat१३p३८.jpg-
L२१५८३
सुवर्णपालवी महोत्सवात कृषी प्रदर्शनाबरोबरच काष्ठशिल्पाचा विभाग चित्तवेधक ठरला.
-rat१३p२४.jpg-
L२१५६९
कृषी प्रदर्शनातील कोकण कृषी विद्यापीठाच्या स्टॉलची पाहणी करताना राज्यपाल.
-rat१३p२५.jpg-
L२१५७०
विद्यार्थिनीं संवाद साधताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी.
--------------------

भात, आंब्याच्या विविध जाती लक्षवेधी
सुवर्णपालवी महोत्सव ; प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
हर्णै, ता. १३ ः दापोलीतील कोकण कृषी विद्यापाठातील सुर्वणपालवी महोत्सवातील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात भाताच्या पिकवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या ३१ जाती, त्यामध्ये लाल तांदूळ रत्नागिरी-७, हायब्रीड सह्याद्री, संकरित सह्याद्री या जातींचा विशेष सहभाग केला होता. तसेच आंब्याच्या विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध प्रकारच्या १५० देश-विदेशातील जातींचे सादरीकरण या ठिकाणी करण्यात आले आहे.
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ ''सुवर्ण पालवी'' कृषी महोत्सव उद्घाटन समारंभाच्यावेळी विविध शेती व मस्त्यशेतीविषयक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.
माती विनाशती (हायड्रोफॉनिक्स) उपक्रमांतर्गत भाजीपाला लागवडीसंदर्भात माहिती दिली जात होती. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाजीपाल्याच्या विविध जाती तसेच कंदवर्गीय पिकांचे विविध नमुने या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. जैविक खते उत्पादनांचे दालन या ठिकाणी ठेवण्यात आले होते. जैवतंत्रज्ञानावर आधारित लाल केळी, सफेद वेलची, केळी या केळ्यांच्या जातीही लक्ष वेधून घेत आहेत.
मत्स्यशेतीअंतर्गत शोभिवंत मत्स्यपालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, खेकडा पुष्टिकरण आदी प्रकारचे मत्स्यशेती संदर्भातले नमुने शेतकऱ्यांचे आकर्षण ठरत आहेत. कीटकशास्त्र विभागांतर्गत विविध कीड नियंत्रणाची उपाययोजना, विविध पिकांवरील किडींची व त्यांच्या नियंत्रणाची माहिती प्रदर्शनामध्ये दिली जात आहे. शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे व सर्व यंत्रसामुग्रीबाबत माहिती व नमुने या ठिकाणी उपलब्ध आहेत. मृद व रसायनशास्त्रांतर्गत अन्नपूर्णा ब्रिकेट व आम्रशक्तीचे नमुने या ठिकाणी ठेवण्यात आले होते. तसेच या प्रदर्शनामध्ये पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागांतर्गत शेळीच्या जातीमध्ये कोकणकन्या व गायीच्या जातीमध्ये कोकणकन्या या जाती आकर्षित ठरल्या होत्या. सौरकुकर सोलर टनेल, ड्रायर यासारखे सौरऊर्जेवर चालणारे अपारंपरिक ऊर्जास्त्रोत या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले होते. उद्यानविद्या विभागाने विविध प्रकारच्या जातीच्या फळांपासून विविध प्रकारचे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्याचे प्रदर्शन आयोजित केले होते. तसेच बांबू संग्रहालय आणि बांबू वर्कशॉपमध्ये तर विविध वस्तूंचे प्रदर्शन आदी तऱ्हेचे प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दापोली कृषी विद्यापीठाबरोबरच पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठ राहुरी यांनी सहभाग घेतला होता.

चौकट
राज्यपालांकडून विद्यार्थिनींशी संवाद
दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे प्रदर्शनाची पाहणी करत असताना तेथे असलेल्या विद्यार्थिनीची त्यांनी आपुलकीने चौकशी केली व त्यांच्यासोबत फोटोही काढला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57881 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top