खेडचे ऐतिहासिक वैभव असलेल्या खांबतळ्याचे सुशोभीकरण रखडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेडचे ऐतिहासिक वैभव असलेल्या खांबतळ्याचे सुशोभीकरण रखडले
खेडचे ऐतिहासिक वैभव असलेल्या खांबतळ्याचे सुशोभीकरण रखडले

खेडचे ऐतिहासिक वैभव असलेल्या खांबतळ्याचे सुशोभीकरण रखडले

sakal_logo
By

rat१३p५.jpg ः
21481
खेड शहरातील पुरातन खांबतळे.
------------
ऐतिहासिक खांबतळ्याचे सुशोभीकरण रखडले
आठ कोटीचा निधी मंजूर; सुशोभीकरणाच्या कामाला ब्रेक
सिद्धेश परशेट्ये ः सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. १३ः शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या खांबतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम नगरपालिका प्रशासनाने सुरू केले. शासनाच्या सरोवर संवर्धन या योजनेतून या कामासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे; मात्र झालेले सुशोभीकरणाचे काम काही महिन्यातच बंद पडले. नगरपलिका कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या खांबतळ्याची निर्मिती ही १८७० सालादरम्यान झाली आहे.
त्या काळी आलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी ब्रिटिश सरकारने या तळ्याची निर्मिती केली होती. या तळ्याच्या मधोमध एक खांब आहे. या तळ्यात दोन विहिरीचे पाणी खेड शहराला पुरवले जात असे; मात्र काही वर्षांपूर्वी तळ्याचे सुशोभीकरण करताना या विहिरी बुजवण्यात आल्याचे सांगण्यात येते. तळ्याच्या मधोमध असलेल्या खांबावरूनच या तळ्याला खांबतळे असे नाव पडले आहे. खेड शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या या तळ्याला काही वर्षापूर्वी जलपर्णीने वेढले होते. तळ्यात जलपर्णीही वनस्पती इतकी वाढली होती की, तळ्यातील जलचरांना आपला जीव गमवावा लागला होता. प्रसारमाध्यमांनी याबाबत सातत्याने लिखाण केल्यावर जाग आलेल्या प्रशासनाने तळ्याच्या पाण्यावर वाढलेल्या जलपर्णीचा नायनाट केला होता.
खेड शहरातील हे ऐतिहासिक तळे सुशोभित करण्याचा निर्णय पाच वर्षापूर्वी नगरपालिका प्रशासनाने घेतला तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्यानंतर राज्याचे तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धन या योजनेतंर्गत तळ्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. हा निधी उपलब्ध होताच पालिकेने तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू केले.
सुशोभीकरणाला सुरवात झाल्याने आता अल्पावधीतच शहरातील ऐतिहासिक खांबतळ्याला एका नवा साज चढेल, अशी अपेक्षा खेडच्या जनतेला होती; मात्र सुरू झालेले सुशोभीकरणाचे काम ठेकेदाराने अचानक बंद केले आणि खेडच्या जनतेच्या अपेक्षेवर पाणी फेरले गेले.

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
खेड शहराची वेगळी ओळख असलेल्या या तळ्याच्या सुशोभीकरणासाठी नगरपालिका प्रशासनाकडे करोडो रुपयांचा निधी पडून आहे; मात्र शहर विकासाच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे असणाऱ्या सुशोभीकरणाबाबत लोकप्रतिनिधींमध्ये सकारात्मक मानसिकता नसल्याने गेली चार वर्षे सुशोभीकरणाचे काम ठप्प आहे. ठेकेदाराने सुशोभीकरणाचे काम बंद ठेवले असल्याने कामाच्या पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गेली चार वर्षे तळ्याच्या सुशोभीकरणाचे काम अपूर्णावस्थेत असल्याने हे काम करायचे नव्हते तर मग सुरूच कशाला केले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57882 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top