
गुहागर ः फळबाग लागवड योजनेत सुपारीचा अंतर्भाव
rat१३p२९.jpg
२१५७४
सुपारीचे संग्रहित छायाचित्र
------------
फळबाग लागवड योजनेत सुपारीचा अंतर्भाव
लाभार्थींना १०० टक्के अनुदान ; ०.१ ते २ हेक्टरपर्यंतचे निकष
गुहागर, ता. १३ ः रत्नागिरी जिल्ह्यात गेली १० वर्षे फळबाग लागवडीचा शासनाकडून आग्रह होत आहे. या योजनेत सुपारी पिकाचाही अंतर्भाव आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्यरेषेखालील शेतकरी तसेच भूसुधार योजना, इंदिरा आवास योजना आणि कृषि कर्जमाफी योजना २००८ नुसार ०.१० ते २.०० हेक्टरपर्यंत जमीन असलेले (जमीनमालक किंवा कुळ) शेतकरी यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. केंद्र शासनाकडून या योजनेतील लाभार्थींना १०० टक्के अनुदान देण्यात येत आहे.
फळबाग लागवड योजनेमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि चिकू या झाडांचा समावेश आहे. प्रत्येक पिकाप्रमाणे हेक्टरी किती लागवड करावी, हे निश्चित करण्यात आले आहे. आंबा आणि चिकू हेक्टरी १०० झाडे, काजू २००, नारळ १५० तर सुपारीची १ हेक्टरमध्ये १३७० रोपांची लागवड लाभार्थी करू शकतो.
या योजनेचा लाभ ५ गुंठे ते २ हेक्टर जमीन असलेल्यांनाच मिळणार आहे. लाभार्थ्याने विहित नमुन्यामध्ये ग्रामपंचायतीकडे अर्ज करायचा आहे. त्यासाठी १ जून ते ३१ डिसेंबर अशी तब्बल ७ महिन्यांची कालमर्यादा आहे. ग्रामसभेची मंजुरी मिळाल्यानंतरच लाभार्थ्याची निवड निश्चित होईल. प्रत्येक लाभार्थ्यांने जॉबकार्ड काढणे आवश्यक आहे. योजनेअंतर्गत कामे जॉबकार्डधारक मजुराकडून करून घ्यायची आहे. त्यांनाच मनरेगाची मंजुरी मिळू शकते. फळबाग लागवडीचे संवर्धन आणि जोपासना करण्याची जबाबदारी लाभार्थ्याची असेल. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी फळबाग रोपे जिवंत असण्याची शासनाने ठरवून दिलेली टक्केवारी राखावी लागेल तरच दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीचे अनुदान मिळू शकते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57883 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..