रत्नागिरी ः मराठा मंदिर संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः मराठा मंदिर संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार
रत्नागिरी ः मराठा मंदिर संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार

रत्नागिरी ः मराठा मंदिर संस्थेचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार

sakal_logo
By

rat१३p२२.jpg
२१५२९
चिपळूणः डॉ. तानाजीराव चोरगे यांना पुरस्कार प्रदान करताना मराठा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. यशवंत कदम, लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव.
--------------
डॉ. चोरगेंच्या ‘झेप’ला पुरस्कार
चिपळूण, ता. १३ ः साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करत विविध साहित्य प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना मुंबईतील मराठा मंदिर संस्था दरवर्षी वाङ्मय पुरस्कार जाहीर करते. २०१९ सालचा आत्मचरित्र या साहित्य प्रकारातील प्रथम पुरस्कार डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या ''झेप'' आत्मचरित्रास प्रदान करण्यात आला.
कोरोना आणि इतर कारणांमुळे या पुरस्काराचे वितरण केले नव्हते. या पुरस्काराचे वितरण नुकतेच चिपळूण येथे मराठा मंदिर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. यशवंत कदम आणि लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. तानाजीराव चोरगे यांनी कथा, कादंबऱ्या, नाटक, संकिर्ण, बॅंकिंग आणि व्यवस्थापन, आत्मचरित्र अशा अनेक साहित्य प्रकारात विविधांगी लेखन केले आहे. त्यांची ४५ पुस्तके प्रकाशित आहेत. झेप हे ८५० पेक्षा अधिक पृष्ठसंख्या असलेले त्यांचे प्रदीर्घ आत्मचरित्र आहे.
लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष सुनील खेडेकर, नामवंत कवी आणि समीक्षक अरुण इंगवले, प्रकाश घायाळकर, मनिषा दामले, संजय शिंदे, जिल्हा बँकेचे अधिकारी वसंत सावंत, अजय कदम आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57888 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top