आरोग्यवर्धिनीच्या इमारतीत मातेची पहिली प्रसूती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्यवर्धिनीच्या इमारतीत मातेची पहिली प्रसूती
आरोग्यवर्धिनीच्या इमारतीत मातेची पहिली प्रसूती

आरोग्यवर्धिनीच्या इमारतीत मातेची पहिली प्रसूती

sakal_logo
By

...
-rat13p23.jpg
21530
-गुहागर ः तळवली आरोग्य केंद्रातील बालक आणि आईला बेबी कीट देताना स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य.
..
काही सुखदः लोगो
-------------
आरोग्यवर्धिनीच्या इमारतीत मातेची पहिली प्रसूती

तळवलीत केंद्र; स्वराज्य प्रतिष्ठानकडून आई व बाळाला साडी, बेबी कीट
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. १३ ः गुहागर तालुक्यातील आयुष्मान भारतअंतर्गत बांधण्यात आलेल्या आरोग्यवर्धिनी केंद्राच्या नवीन इमारतीत पहिली प्रसूती झाली. या पहिल्या प्रसूती झालेल्या मातेला बेबी कीट व साडी देऊन स्वराज प्रतिष्ठान तळवलीकडून गौरवण्यात आले.
तळवली परिसरातील ३४ ते ३५ गावांचे असलेले या आरोग्यकेंद्रात चांगल्याप्रकारे येथील कर्मचारी सेवा देत आहेत. ग्रामीण डोंगराळ भागातून रात्री-अपरात्री येणाऱ्या ग्रामस्थांची होणारी गैरसोय दूर झाली आहे. साप, विंचूदंश अशा रुग्णांवर प्राथमिक उपचार होत आहेत.
पहिली प्रसूती झालेल्या बालक व आईला बेबीकिट व साडी देऊन स्वराज प्रतिष्ठान तळवलीकडून देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. देसाई, आरोग्यसेविका, कर्मचारी तसेच प्रतिष्ठानचे दिलीप आग्रे, गणपत शिगवण, सुरेश सांगळे, हेमंत चव्हाण, अरुण कळबाटे, दत्ताराम आग्रे, संजय शिगवण, संदीप शिगवण, मकरंद बागकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------
बाळाचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन
केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये नुकतीच अंकिता कदम (रा. कातकरी, ता. गुहागर) यांची यशस्वीरित्या पहिली प्रसूती या इमारतीमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ. देशमुख, डॉ. देसाई व आरोग्यसेविका यांनी पार पाडली आहे. यापूर्वी या भागातील ग्रामस्थांना प्रसूतीसाठी इतर ठिकाणी जावे लागत असे; परंतु ही गैरसोय आता दूर झाली आहे. त्यामुळे सर्वच ग्रामस्थांना त्याचा लाभ होणार आहे. प्रसूती झालेल्या महिलेस बाळाचे जन्म प्रमाणपत्र ऑनलाइन पद्धतीने डॉ. देशमुख यांनी दिले असून त्यांना आता ग्रामपंचायतीमध्ये नोंद करण्याची गरज नाही. तोच जन्मदाखला म्हणून चालणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57889 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top