
कोदवली धरणात खडखडाट
rat१३p४४.jpg-
२१५९२
राजापूरः कोदवली धरणातील पाण्याने तळ गाठला आहे.
---------------
कोदवली धरणात खडखडाट
पाणी जपून वापरण्याचे आवाहन ; शहराला दोन आणि कोदवली, साईनगरला तीन दिवसांनी पाणी
राजापूर, ता. १३ः अतिशय तीव्र उन्हाळी हंगामामुळे कोदवली धरणातील जलसाठा संपुष्टात आला आहे. पाणीप्रवाह अत्यल्प सुरू आहे. जॅकवेलकडून येणारा पाणीप्रवाहही खूपच कमी झाला आहे. त्यामुळे राजापूरवासीयांना आता एक दिवसाऐवजी दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
जॅकवेलमधून येणारे पाणी विजेवर अवलंबून आहे. वीजप्रवाह बंद झाल्याने अनेकदा दिवसभरात प्रवाहात खंड पडतो. या कारणांमुळे पाणी साठवण टाकीमध्ये अपेक्षित पाणीसाठा होण्यास खूप जास्त तास लागत आहेत. पाणीसाठा करणे व पाणीपुरवठा त्या त्या भागात करणे यासाठी एक दिवस आड करून पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे आता पाणीपुरवठा दोन दिवसाआड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२ मे रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागाला १५ मे रोजी, १३ मे रोजीच्या भागाला पुढे १६ मे रोजी याप्रमाणे पाणीपुरवठा होईल. शहराबाहेरील साईनगर आणि कोदवली पुनर्वसन भागातील पाणीपुरवठा तीन दिवसाआड होण्याची शक्यता आहे.
सन २०२० च्या उन्हाळी हंगामात २५ एप्रिल, तर २०२१ मध्ये ११ मेपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाला होता; मात्र गतवर्षी वादळी पावसामुळे पाणीसाठा वाढल्याने २१ मेपासून नियमित पाणीपुरवठा सुरू होता. या पाणीटंचाईच्या काळात पाणी जपून आणि काटकसरीने वापरा. पाण्याचा आवश्यक तो साठा राहील, याची कृपया काळजी घ्या. पाणी गाळून आणि उकळून प्या आणि नगर पालिकेला आवश्यक ते सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57892 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..