घरपट्टीचे ८ कोटी २८ लाख थकित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरपट्टीचे ८ कोटी २८ लाख थकित
घरपट्टीचे ८ कोटी २८ लाख थकित

घरपट्टीचे ८ कोटी २८ लाख थकित

sakal_logo
By

घरपट्टीचे ८ कोटी २८ लाख थकित
जिल्हा परिषद ; ४१ कोटी ६९ लाखाची वसुली
रत्नागिरी, ता. १३ ः जिल्हा परिषद ग्रामविकास विभागामार्फत मागील आर्थिक वर्षात ४१ कोटी ६९ लाख ८४ हजार २२६ रुपये घरपट्टी वसुली केली असून अजूनही ८ कोटी २८ लाख ३९ हजार ५० रुपये थकित आहेत. वसुलीचे प्रमाण ८३.४३ टक्के आहे.
जिल्हा परिषदेला घरपट्टी, पाणीपट्टीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. जिल्ह्यात ८४६ ग्रामपंचायती असून, घरपट्टी आकारणी या ग्रामपंचायतींकडून करण्यात येते. जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये उद्योग, व्यापार, कारखानदारी असलेल्या कमीच ग्रामपंचायती आहेत. रत्नागिरीतील शिरगाव, फणसोप, जयगड, कुवारबाव, मिरजोळे या ग्रामपंचायती आणि इतर तालुक्यांमध्येही कारखानदारी असलेल्या काही ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींचे वार्षिक उत्पन्न लाखो रुपयांचे आहे. बाजारपेठ असलेल्या संगमेश्वर, अंजनवेल, लोटे अशा ग्रामपंचायतींचे उत्पन्नही जास्त आहे. डोंगरदर्‍यात व अगदी ग्रामीण भागात असलेल्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न अत्यल्प आहे. त्यामुळे सोयीसुविधा पुरवताना या ग्रामपंचायतींना शासनाकडून येणार्‍या अनुदानावरच अवलंबून राहावे लागते.
जिल्हा परिषदेला घरपट्टी आकारणीचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिलेले असते. २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये ४३ कोटी ७८ लाख ६ हजार ६४१ रुपये एवढे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४१ कोटी ६९ लाख ८४ हजार २२६ रुपये वसुली करण्यात आली. २१-२२ या वर्षाची उर्वरित घरपट्टीची थकित रक्कमही यामध्ये घरमालकांकडून वसूल करण्यात आली आहे. मागील वर्षाची घरपट्टीची ६ कोटी २० लाख १६ हजार ६३५ रुपये एवढी थकबाकी वसूल करायची होती.
---------------
चौकट
तालुका थकित घरपट्टी (रुपये)
* मंडणगड ७,२३,१३८
* दापोली १,३२,८५,२०५
* खेड १,५५,३१,८५३
* चिपळूण १,२९,७२,६४६
* गुहागर २,५२,४६,७६८
* संगमेश्वर ८५,४५,९८३
* रत्नागिरी २५,४०,८९०
* लांजा १३,३९,६६६
* राजापूर २६,५२,९०१

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57894 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top