रेस्क्यूचे १०७ जणांना धडे; प्रशिक्षणाचे महत्व वाढले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेस्क्यूचे १०७ जणांना धडे; प्रशिक्षणाचे महत्व वाढले
रेस्क्यूचे १०७ जणांना धडे; प्रशिक्षणाचे महत्व वाढले

रेस्क्यूचे १०७ जणांना धडे; प्रशिक्षणाचे महत्व वाढले

sakal_logo
By

....
-rat13p43.jpg
21591
ः चिपळूण ः सहभागी तरुणांना आपत्तीविषयक प्रशिक्षण देण्यात आले.
..
आपत्तीचा मुकाबलाः लोगो
---------------
रेस्क्यूचे १०७ जणांना धडे; प्रशिक्षणाचे महत्व वाढले

चिपळूण, ता. १३ ः गतवर्षीच्या पावसाळ्यात चिपळूण शहरासह परिसरात महापूर आणि अतिवृष्टीने हाहाकार उडवला होता. त्यामुळे यावर्षी नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. आपत्तीकाळात बचावकार्यातून भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. शुक्रवारपासून (ता. १३) शहरातील श्री गांधारेश्वर मंदिर येथील वाशिष्ठी नदी परिसरात या प्रशिक्षणाला सुरवात झाली आहे. दरम्यान, महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागानेही या प्रशिक्षणाचे महत्व वाढले आहे.
यामध्ये १०७ नागरिक व नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी रेस्क्यूचे विविध धडे घेत आहेत. विशेष म्हणजे महिला यामध्ये सहभागी झाल्या आहेत. हे प्रशिक्षण १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. पुणे येथील अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेमार्फत आपत्ती व्यवस्थापनांतर्गत तीन दिवस सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षणापूर्वी नुकतीच पात्रता निवड चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत३७ जलतरणपटूंची निवड करण्यात आली होती. या वेळी अस्तित्व लाईफ सेव्हिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे संचालक भूषण देशपांडे यांनी नागरिक व नगर पालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची निवड केली होती. या वेळी प्रशिक्षण शिबिराची माहिती देताना त्यांनी यामध्ये लोकसहभाग वाढावा, असे आवाहनही केले होते. या बरोबरच चिपळूण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी प्रमोद ठसाळे, अनंत मोरे व विविध खाते प्रमुखांनीही या शिबिरात अधिकाधिक नागरिक सहभागी होतील यासाठी प्रयत्न केले.
भूषण देशपांडे व त्यांच्या टीमने उपस्थितांना पोहण्याचे प्रकार, रेस्क्यू कसे करावे, कोणते नियम पाळावेत, सुरक्षितता कशी बाळगावी, रेस्क्यू केल्यानंतर संबंधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी कशा प्रकारे स्थलांतरित करावे या शिवाय रेस्क्यूच्या विविध टीप्स सांगितल्या. तसेच बचावकार्यातील प्रात्यक्षिकेही दाखवली.
-----------
महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग
मुख्याधिकारी शिंगटे यांनी एक ऑडिओ क्लीप बनवून त्याद्वारेही नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी तब्बल १०७ जण सहभागी झाले. यामध्ये ४८ नागरिक तर ५९ न. पं. अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही रेस्क्यूचे धडे घेतले. महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागानेही या प्रशिक्षणाचे महत्व वाढवले.
..
पहिल्या दिवशी सहभागी ः १०७
यामध्ये नागरिकः ४८
न. पं. अधिकारी, कर्मचारीः ५९

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57895 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top