कणकवलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा
कणकवलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

कणकवलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

sakal_logo
By

21594
कणकवली : शहरातील बिजलीनगर येथे टँकरच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा.

कणकवलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

बिजलीनगरमधील समस्येची नगराध्यक्षांकडून दखल

कणकवली, ता.१३ : कणकवली शहरात बिजलीनगर येथे गेले दोन दिवस पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. बिजलीनगर भागातील नळयोजनेची पाईपलाईन फुटल्‍याने येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात येता आज नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी टँकरच्या माध्यमातून बिजलीनगर भागाला पाणी पुरवठा केला.
सध्या या भागातील जलवाहिनीचे दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून उद्यापासून बिजलीनगर भागाचा पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्‍यता असल्‍याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्‍यान टँकरद्वारे पाणी पुरवठा केल्‍याबद्दल बिजलीनगर भागातील नागरिकांकडून समाधान व्यक्‍त करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57900 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top