
तत्कालीन वनपालावर पोलीसात गुन्हा कुडाळ पोलीसात गुन्हा
तत्कालीन वनपालावर
कुडाळ पोलीसात गुन्हा
बदली पास घोटाळा ः बरेगार यांची तर्रार
सका वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः शासकीय पदाचा गैरवापर करत बनावट कागदपत्र तयार करुन वरिष्ठांची दिशाभूल करत बदली पास प्रकरणी जयंत बरेगार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माणगाव येथील तत्कालीन वनपाल सुनिल प्रकाश सावंत यांच्यावर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माणगाव येथील तत्कालीन वनपाल सावंत यांनी २८ जानेवारी २०१९ ला आपल्या कार्यक्षेत्रात वनपोज वाहतूक करताना गाडीत बिघाड झाल्याने त्याची वाहतुक करण्यासाठी बदली पास प्रकरण केले होते. यामध्ये त्यांनी शासनाची दिशाभूल करताना हा वनोपज कुठे कुठल्या सर्व्हे नंबरमध्ये उतरविला हे न दाखविता खोटे पंच दाखवून बदली पास प्रकरणात खरे असल्याचे भासविले असा त्यांच्यावर आरोप आहे. हा प्रकार बरेगार यांनी माहितीच्या अधिकारात उघड केला होता. त्यानुसार त्यांनी संबधीत वनपालावर कायदेशीर कारवाईची मागणी गेले वर्षभर लावून धरली होती; मात्र वनविभाग आणि कुडाळ पोलिस ठाणे एकमेकांवर ढकलण्याचे काम करत होते. अखेर मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा आधार घेत बरेगार यांनी पुन्हा याकरिता कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. तरिही पोलिसांकडून चालढकलपणा सुरु होती; मात्र पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग हाती घेतल्यानंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यास तयार झाले. आज अखेर बरेगार यांचा रितसर तक्रार अर्ज दाखल करुन घेत तत्कालीन वनपाल सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57905 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..