कणकवली पटवर्धन चौकातील शेड हटविल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली पटवर्धन चौकातील शेड हटविल्या
कणकवली पटवर्धन चौकातील शेड हटविल्या

कणकवली पटवर्धन चौकातील शेड हटविल्या

sakal_logo
By

21599
कणकवली : शहरातील पटवर्धन चौकातील शेड हटविताना नगरपंचायत कर्मचारी.


पटवर्धन चौकातील शेड हटविल्या

कणकवलीत पार्किंगचे नियोजन; भाजी विक्रेत्‍यांवरही कारवाई

कणकवली, ता.१३ : शहरातील पटवर्धन चौक भागात दुचाकी पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी कणकवली नगरपंचायतीने आज या भागात उभारण्यात आलेल्‍या फूल व्यावसायिकांच्या शेड हटविल्‍या. याखेरीज शहर बाजारपेठेत दुकानांच्या पुढे बसलेल्‍या भाजी विक्रेत्‍यांवरही नगरपंचायत पथकाने कारवाई केली. तर सेवा रस्त्यावर ‘नो पार्किंग’ क्षेत्रात उभ्या केलेल्‍या वाहनांवरही कणकवली पोलिसांनी दंडात्‍मक कारवाई केली.
शहरातील वाहतुकीचे नियोजन होण्यासाठी नुकतीच नगरपंचायत कार्यालयात भाजी विक्रेते, रिक्षा, टेम्‍पो व्यावसायिक, पोलिस प्रशासनाची संयुक्‍त बैठक झाली होती. यात सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर दंडाची कारवाई तर भाजी विक्रेत्‍यांनी रस्त्यावर न बसता उड्डाणपुलाखालील नेमून दिलेल्‍या जागेतच व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले होते. तरीही आज शहर बाजारपेठेत काही भाजी विक्रेत्‍यांनी रस्त्यावर दुकाने थाटली होती. नगरपंचायत पथकाने या विक्रेत्‍यांकडील भाजीचे साहित्‍य जप्त करण्याची कारवाई केली. तर पटवर्धन चौकात दुचाकी पार्किंगची व्यवस्था होण्यासाठी त्‍या भागात उभारलेले शेडचे साहित्‍य हटविले.

चालकांवर दंडात्मक कारवाई
दरम्यान, पटवर्धन चौकात आझाद मेडिकल समोरील भागात मोकळ्या जागेत वाहने पार्किंगसाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही चौकात रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्‍याने अशा वाहन चालकांवर सायंकाळपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57908 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top