
मासेमारीसाठी राहिले फक्त १८ दिवस
मासेमारीसाठी राहिले फक्त १८ दिवस
रत्नागिर, ता. १३ः राज्यात यांत्रिकी मासेमारी नौकांना १ जून ते ३१ जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली असून, याबाबत मत्स्य व्यवसाय आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी आदेश जारी केले आहेत. मासेमारी बंदी आदेशाचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्यात यावी, अन्यथा सागरी अधिनियमाद्वारे कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ४४२ बिगर यांत्रिकी नौका तर ३ हजार ७७ यांत्रिकी नौका आहेत. यांत्रिकी नौकांना बंदी आदेश लागू असून पारंपारिक पद्धतीने बिगर यांत्रिकी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या मासेमारीस बंदी नाही. राज्याच्या जलधी क्षेत्रात खोल समुद्रात सागरी किनाऱ्यापासून १२ मैलाच्या पुढे जाणाऱ्या मासेमारी नौकांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना लागू राहणार आहेत. सागरी किनाऱ्यापासून बारा मैलापर्यत बंदी कालावधीत मासेमारी करताना आढळल्यास महाराष्ट्र सागरी नियमन अधिनियमानुसार संबंधित नौका, सर्व साधनसामुग्री व मासळी जप्त करून कठोर कारवाई केली जाणार आहे. बंदी कालावधीत मासेमारी करताना अपघात झाल्यास शासनाकडून कोणतीही मदत मिळणार नाही असे आदेशात स्पष्ट नमूद करत बंदी आदेशाचा भंग होणार नाही यांची दक्षता मच्छीमारांनी घ्यावी असे आवाहन मत्स्य व्यवसाय विभाग आयुक्तांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57911 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..