
जलवाहिनीची दुरूस्ती पाणीटंचाईला निमंत्रण देणारी
-rat13p49.jpg
L21603
- राजापूर ः तालीमखाना-जवाहर चौक रस्त्यात जलवाहिनीसाठी केलेले खोदकाम.
-------------
जलवाहिनीची दुरूस्ती पाणीटंचाईला निमंत्रण देणारी
राजापुरातील कामाचा नागरिकांना ताप; प्रवाशांची गैरसोय
राजापूर, ता. १३ ः गेली कित्येक वर्षे होणार, होणार म्हणून गाजलेल्या शहरातील तालीमखाना ते जवाहर चौक या मुख्य रस्त्याच्या कामाला सुरवात झाली; मात्र ऐन उन्हाळी सुट्टीत गर्दीच्या हंगामात हे काम हाती घेण्यात आल्याने शहरासह ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या सर्वसामान्य जनतेची मात्र फरफट झाली. या रस्त्यात असलेल्या पाणीपुरवठा वाहिनीचे कामही रस्ता दुरस्तीत हाती घेण्यात आल्याने ऐन पाणीटंचाईत या वाहिनीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना आणखीनच पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यासाठी एक कोटीचा निधी मंजूर होणार, असे सांगितले जात होते. अखेर हा निधी मंजूर झाला व या कामाची निविदा काढून कामाचा आरंभही करण्यात आला. सुमारे एक कोटी रुपये खर्चाचे हे रस्ता डांबरीकरणाचे काम आहे; मात्र हे काम हे संबंधित ठेकेदाराला काम करण्याचे आदेश देऊनही त्यांनी उशिरा सुरू केले आहे. त्यामुळे याचा फटका सर्वसामान्य जनता, नागरिक, व्यापारी आणि प्रवाशांना आता बसत आहे.
यापूर्वी छत्रपती शिवाजीपथ ते बंदरधक्का रोडचे काम करण्यात आल्याने तब्बल दोन महिने तो रस्ता बंद होता. त्यामुळे मोठी गैरसोय झाली तर आता मे महिन्याचा सुट्टीचा आणि गर्दीच्या हंगामातच या मुख्य रस्त्याचे काम सुरू करून या मार्गावरील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने प्रवाशांची आणखी गैरसोय झाली आहे.
..
नागरिकांतून संताप
दरम्यान, या रस्त्याच्या कामातच रस्त्यात असलेल्या पाणीपुरवठा वाहिनेचे काम हाती घेण्यात आल्याने या वाहिनीवर अवलंबून असलेल्या अनेक भागात पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. अगोदर एक दिवसाआड, आता दोन दिवसाआड आणि पाणीपुरवठा वाहिनी खोदकामामुळे आठवडाभर काहींना पाणीच नाही, अशी अवस्था आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
--------
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57912 Txt Ratnagiri
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..