
परिवर्तनाची अपेक्षा; पण निराशा
21606
कणकवली : येथील ‘अखंड लोकमंच’च्या मुक्त संवाद कार्यकमात कवी लोकनाथ यशवंत यांचा सत्कार करताना नामानंद मोडक, संतोष राऊळ आदी.
परिवर्तनाची अपेक्षा; पण निराशा
कवी लोकनाथ : ‘अखंड लोकमंच’चा कणकवलीत मुक्त संवाद
कणकवली, ता.१३ : सद्यस्थितीत परिवर्तन घडावे, अशी अपेक्षा अनेकांची आहे; मात्र प्रत्येकजण व्यक्त होत नसल्याने वेगळे घडतांना काहीच दिसत नसल्याने निराशा होत आहे, अशी खंत कवी लोकनाथ यशवंत यांनी येथे व्यक्त केली.
‘अखंड लोकमंच कणकवलीच्या’वतीने कवी यशवंत लोकनाथ यांच्याशी मुक्त संवाद कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अखंड लोकमंच संस्थेचे अध्यक्ष नामानंद मोडक, संस्थेचे विश्वस्थ संतोष राऊळ यांच्या हस्ते लोकनाथ यशवंत यांना पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विजय जाधव, संवादक कल्पना मलये, कवी मोहन कुंभार, कवी राजेश कदम, विनायक सापळे, शैलजा कदम, आनंद तांबे, समुद्र लोकनाथ यशवंत, किरण कदम आदी उपस्थित होते. यावेळी आता होऊन जाऊ द्या..! ‘आणि शेवटी काय झाले ?’ ‘पुन्हा चाल करू या..!’ या कविता संग्रहावर चर्चा करण्यात आली. कवी लोकनाथ यांची कविता माणूस केंद्रबिंदू मानणारी, समूहनाचा आविष्कार घडविणारी, व्यवस्थेचे अचूक आकलन असलेली, लोकांची, चळवळीचे मोर्चा हे आयुध मानणारी अशी आहे, असे लेखिका कल्पना मलये, कवी मोहन कुंभार यांनी सांगितले. किरण कदम आणि विनायक सापळे यांनी विविध विषयांवर मते मांडली.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57915 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..