
अण्णा महाराज मूर्तीची पिंगुळीत प्रतिष्ठापना
21607
पिंगुळी ः प. पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज मूर्ती व गुरू पादुका प्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी भाविक.
21608
पिंगुळी ः कलशारोहण कार्यक्रम प्रसंगी भाविक.
अण्णा महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना
पिंगुळीत भक्तिमय वातावरण; सोहळ्याला भाविकांची अलोट गर्दी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १३ ः पिंगुळीचे प. पु. विनायक (अण्णा) राऊळ महाराज मूर्ती व गुरु पादुका प्रतिष्ठापना सोहळा भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आज सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला होता. महाराजांचे निस्सीम भक्त, उद्योजक सुवर्णा आमोणकर यांच्या हस्ते कलशारोहण झाले.
यावेळी उद्योजक विश्वस्त अनिल खंवटे (गोवा), उपेंद्र रायकर (गोवा), अशोक कदम (मुंबई), महादेव पांगे, विनय पाटील आदी उपस्थित होते. मंदिर आणि परिसरातील इतर मंदिरांची सजावट डेकोरेटर अजित आंगणे, किशोर नेवरेकर, सुधीर नेवरेकर, अॅड. सूरज कुडाळकर आदींनी केले.
माऊली आणि बल्लाळ देखावा, कमल मोहिनी महालक्ष्मी देखावा महेश कुडाळकर यांनी साकारला. मूर्ती मिरवणूक सजावट बाबल निचम, प्रसाद दळवी आणि सहकारी यांनी केली. श्री दत्त संगीत भजनी मंडळ, (बच्चे सावर्डे-कोल्हापूर) यांचे सुश्राव्य भजन झाले. सुजाता विनय पाटील लिखित सद्गुरू समर्थ अण्णा महाराज लीलामृत पोथीचे प्रकाशन आणि बाळ कालेकर संपादित सद्गुरू समर्थ राऊळबाबा या मासिक विशेषांक प्रकाशन प.पु बाई माँ यांच्या हस्ते करण्यात आले. साटेली भेडशी दोडामार्ग येथील प्रसिद्ध नकलाकार अरुण वासुदेव गवंडकर यांचा मनोरंजक नकलांचा कार्यक्रम झाला. सायंकाळी गायिका कविता देशपांडे यांचे गायन, सांज आरती झाली. वालावल येथील रणरागिणी ढोल पथकांच्या मदतीने श्रींचा पालखी मिरवणूक सोहळा झाला. सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, कुडाळ यांचे सुश्राव्य भजन, युवा नृत्य महोत्सव संतांचे अभंग आणि मराठी लोकनृत्याविष्कार चिमणीपाखरे कुडाळ, भूषण बाकरे, ओमसाई सावंतवाडी, सिद्धार्थ ग्रुप पिंगुळी जाधव पेंडूर मालवण, श्री. किरण आचरेकर मुंबई यांच्या सौजन्याने कायक्रम झाले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57918 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..