आनंदराज आंबेडकर उद्या चिपळुणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आनंदराज आंबेडकर उद्या चिपळुणात
आनंदराज आंबेडकर उद्या चिपळुणात

आनंदराज आंबेडकर उद्या चिपळुणात

sakal_logo
By

आनंदराज आंबेडकर आज चिपळुणात
चिपळूणः रिपब्लिकन सेना या राजकीय संघटनेचे अध्यक्ष आणि बौद्धजन पंचायत समिती सभापती आनंदराज आंबेडकर 14 व 15 मे रोजी लांजा आणि चिपळूण दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते यांनी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी या पक्षातून बाहेर पडण्याचे घोषणा केल्यानंतर हा कोकणातील पहिला दौरा असून आंबेडकर काय बोलणार? यावर जनतेचं लक्ष लागलं आहे. प्रकाश आंबेडकर यांनी उभा केलेला वंचित बहुजन आघाडी हा पर्याय समस्त आंबेडकर जनतेला निराश करणारा पक्ष आहे. त्याचबरोबर आपण वंचितमधून बाहेर पडत असल्याचे सांगितले आहे. कोकणात आनंदराज आंबेडकर यांना मानणारा मोठा जनसमुदाय आहे. वंचित बहुजन आघाडीतून सर्वात प्रथम बाहेर पडले. भटक्या विमुक्त्यांचे नेते लक्ष्मण माने, त्यानंतर जलील आणि प्रकाश आंबेडकर यांच्या बेबनाव निर्माण झाल्यामुळे एमआयएमसुद्धा वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडली. आनंदराज आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष संदेश मोहिते व आंबेडकर अनुयायांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले.
-----------------
rat13p41.jpg
21586
जळगावः येथे राज्यस्तरीय स्पर्धाप्रसंगी जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंसमवेत राज्य संघटना पदाधिकारी उपस्थित होते.
-------
स्व्कॅश रॅकेटमध्ये पाच पदकांची कमाई
चिपळूण ः रत्नागिरी जिल्ह्यात नियमित सरावासाठी कुठेही कोर्ट नसताना प्रतिकूल स्थितीत मिळेल तिथे सराव करत ऑलिंपिक मान्यताप्राप्त स्व्कॅश रॅकेट क्रीडाप्रकारात जिल्ह्यातील खेळाडूंनी जळगाव येथील राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदकांची कमाई करत आपल्या क्रीडाकौशल्याने अनेकांची मने जिंकली. सेजल कदम, अमन किल्लेकर, क्रीश कलकुटकी, हर्षाली बागुल, प्रवीण चव्हाण या पदकप्राप्त खेळाडूंचे क्रीडाप्रेमींकडून कौतुक होत आहे. गेली १० वर्षे रत्नागिरीतील खेळाडू राज्यस्पर्धा खेळत आहेत. याबाबत स्व्कॅश रॅकेट असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप खंदारे, सचिव दयानंद कुमार, संयोजक जळगाव संघटना अध्यक्ष वेरुळकर यांनी कौतुकही केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57926 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top