
भजनमहर्षी पांचाळ यांच्या स्मारकाचे उद्या उद्घाटन स्मारकाचे उद्या उद्घाटन
L२१६१५
वैभववाडी ः कुसुर येथे भजनमहर्षी परशुराम पांचाळ यांचे बांधण्यात आलेले स्मारक.
भजनमहर्षी पांचाळ यांच्या
स्मारकाचे उद्या उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, ता. १३ ः कुसुर-बाजारवाडी येथे उभारण्यात आलेल्या भजनमहर्षी बुवा परशुराम पांचाळ यांच्या स्मारकांचे उद्घाटन आणि पुतळ्याचे अनावरण रविवारी (ता.१५) होणार आहे. भव्यदिव्य असे हे स्मारक शिष्यगणांनी बांधले आहे.
(कै.) परशुराम बुवा पांचाळ यांना कोकणचे भजन महर्षी म्हणुन ओळखले जातात. त्यांचे मुळ गाव वैभववाडी तालुक्यातील कुसुर आहे. भजन कलेची अविरत सेवा करताना त्यांनी हजारोंना भजन कलेचा वारसा दिला आहे. त्यांचे हजारो शिष्यांनी भजनात नावलौकीक मिळविला आहे. त्यामुळे पांचाळ बुवांचे त्यांच्याच मुळ गावी स्मारक व्हावे, यासाठी गेली दोन तीन वर्ष त्यांचे शिष्यगण प्रयत्न करीत होते. कोरोनामुळे या कामाला गती मिळाली नव्हती; परंतु गेल्या सात आठ महिन्यापासून कुसुर बाजारवाडी येथे स्मारकाच्या कामाला सुरूवात झाली. दहा लाख रूपये खर्चून भव्यदिव्य असे स्मारक उभारण्यात आले आहे. याचे उद्घाटन रविवारी प. पू. उल्हासगिरी महाराज ओणी यांच्या उपस्थितीत होणार आहे. याचवेळी पांचाळ बुवांच्या पुतळ्याचे अनावरण देखील होणार आहे. स्मरणिका प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे. भजनश्रोत्यांना पांचाळ बुवांच्या शिष्यांचे चक्रीय भजन ऐकता येणार आहेत. या कार्यक्रमाला श्रीमती सुजाता श्रीधर सावंत, क्षमा सुरेश कुबल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला पांचाळ बुवांच्या सर्व शिष्यगणानी आणि भजनप्रेमीनी उपस्थित राहावे, असे आवाहन स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष कानडे, सचिव अनंत सुतार यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57928 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..