ओव्हरटेक करणे पडले महागात कारची तीन वाहनांना धडक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओव्हरटेक करणे पडले महागात 
कारची तीन वाहनांना धडक
ओव्हरटेक करणे पडले महागात कारची तीन वाहनांना धडक

ओव्हरटेक करणे पडले महागात कारची तीन वाहनांना धडक

sakal_logo
By

21618
सावंतवाडी : अपघातग्रस्त मोटार.

ओव्हरटेक करणे पडले महागात

सावंतवाडीत मोटारीची तीन वाहनांना धडक

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १३ ः एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात भरधाव वेगात असणाऱ्या मोटारीने समोरील तीन वाहनांना ठोकर दिली. हा अपघात येथील कॉलेज रोडवरील रामेश्वर प्लाझा येथील हॉटेल ज्यूस लँडच्या समोर दुपारी दोनच्या सुमारास झाला. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रामेश्वर प्लाझा समोरील रस्त्यावर बरीच वर्दळ असते. तर दोन्ही बाजूना वाहने पार्क केली जातात. दुपारच्या सुमारास इनोव्हा कार भारधाव वेगाने माजगावच्या दिशेने जात असताना कॉलेज रोड येथे एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा अंदाज चुकला व इनोव्हा कारची धडक समोरील ओमनी कारला बसली. त्यानंतर समोर असलेल्या तीन ते चार दुचाकीना बसून अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही; मात्र एक दुचाकी व ओमनी कारचे मोठे नुकसान झाले आहे. कारचालकाने झालेले नुकसान भरून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा अपघात तडजोडीने मिटवण्यात आला.

भरधाव वेगावर नियंत्रण हवा
दरम्यान, सध्या सुटीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे कोकणात येणारे तसेच कोकणातून गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक पर्यटक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून वाहने हाकतात. परिणामी असे गंभीर अपघात होतात. अशा घटनांमध्ये सर्वसामान्यांचा बळी जातो. स्थानिकांना याचा चांगलाच फटका बसतो. त्यामुळे मुजोर चालकांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57935 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top