गोव्याचे मुख्यमंत्री आज मालवणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोव्याचे मुख्यमंत्री आज मालवणात
गोव्याचे मुख्यमंत्री आज मालवणात

गोव्याचे मुख्यमंत्री आज मालवणात

sakal_logo
By

21620
प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री सावंत
आज मालवण दौऱ्यावर
मालवण : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे उद्या (ता.१४) दुपारी बाराला भाजपच्या शहर ग्रामीण कार्यालयाला भेट देणार आहेत. यावेळी भाजप मालवण शहर आणि ग्रामीणच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर आणि प्रभारी शहर मंडल अध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली. यावेळी सर्व भाजपचे जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, तालुका कार्यकारणी, बूथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख व सर्व आघाड्याच्या अध्यक्षांनी व कमिटीने यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.
---
अखेर पाणीसमस्या झाली दूर
कर्जत : तालुक्यातील दामत भडवळ येथील टाकाची वाडी येथे नळपाणी योजना नसल्याने तेथील एका बोअरवेलमधून ग्रामस्थांची तहान भागवली जात असे. मात्र, काही महिन्यांपूर्वी ही बोअरवेल नादुरुस्त झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. प्रसाद थोरवे यांनी पुढाकार घेत बोअरवेल दुरुस्त केल्याने पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांची तहान भागली असून उन्हात होणारी वणवण थांबली आहे. कर्जत तालुक्यातील दामत भडवळ येथील टाकाची वाडी गावात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तीन विहिरी आहेत. यातील दोन विहिरींनी अगोदरच तळ गाठले होते, तर तिसर्!या विहिरीची पडझड झाल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण फिरावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी वामन वाघ आणि ग्रामपंचायत सदस्य किशोर घारे यांनी ग्रामस्थांसह आमदार महेंद्र थोरवे, युवा सैनिक प्रसाद थोरवे यांची भेट घेतली.
---
मॉन्सूनपूर्व कामे खोळंबली
खोपोली : दरवर्षी खोपोली पालिकेकडून मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून टप्याटप्याने संपूर्ण शहरात मान्सूनपूर्व साफसफाई आणि अन्य अत्यावश्यक कामांना सुरुवात केली जाते. यावर्षी मात्र दुसरा आठवडा संपत आला, तरी कोणत्याही प्रभागात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली नाही. निवडणुकीचे पडघम वाजल्याने नगरपालिकेला या कामांसाठी अद्याप मुहूर्त मिळत नसल्याने नागरिकांसह आजी-माजी लोकप्रतिनिधींमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात पूरस्थिती, रहिवासी भागात पाणी साचून नुकसान टाळण्यासाठी नाले व गटारांची मान्सूनपूर्व साफसफाई दर वर्षी युद्ध पातळीवर केली जातात. यावर्षी या कामांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. वर्तमान स्थितीत खोपोली पालिकेतील लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने संपूर्ण कारभार प्रशासनाकडे गेला आहे.
--------
खालापूर मसळे तलाव मृतावस्थेत
खालापूर : नगर पंचायत हद्दीत असलेला १४ एकर विस्तीर्ण मसळे तलावाचा श्वास जलपर्णीमुळे अनेक वर्षांपासून कोंडला आहे. या तलावात पाण्याचा मुबलक साठा असूनही त्याचा वापर न केल्याने जलपर्णी वाढल्या आहेत. यातून खालापूर शहराची पाणीटंचाईची समस्या दूर होऊ शकते. तरीही तलावाची सफाई केवळ कागदावरच राहिली आहे. खालापूर शहरातून वनवे निंबोडे गावाकडे जाताना मसळे तलाव आहे. या तलावाचे अगोदरचे क्षेत्र १६ एकर असल्याचे शिरवली वाडीत राहणारे काही जुने ग्रामस्थ सांगतात. एवढ्या प्रचंड आकाराच्या तलावाचा कोणताही उपयोग कित्येक वर्ष झालेला नाही. त्यामुळे तलावात मोठ्या प्रमाणात जलपर्णी, शेवाळे साचलेले आहे. परिणामी, तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून खालापूर शहरालाही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.
-------
सावंतवाडीत आज ‘जॉब फेअर’
सावंतवाडी ः यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकच्यावतीने उद्या (ता.१४) सकाळी साडेनऊ पासून ‘जॉब फेअर’चे आयोजन केले आहे. पुणे येथील सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील ‘ट्रेनी अप्रेंटिस इंजिनियर्स’च्या पोस्टसाठी यावेळी मुलाखती घेतल्या जातील. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या शाखांमधील २०१८ ते २०२१ बॅचचे उत्तीर्ण विद्यार्थी तसेच २०२२ मध्ये तृतीय वर्षात शिकत असणारे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकतील. जॉब फेअरमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी कॉलेजचे ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मिलिंद देसाई यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
--
कोकणाचे सौंदर्य कॅनव्हासवर
कर्जता : मूळ दापोली तालुक्यातील शिक्षणासाठी कर्जतच्या दहिवलीमध्ये स्थायिक झालेल्या उदयोन्मुख चित्रकार कुणाल साळवी याच्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे. यात कोकणासह मुंबईतील विविध ठिकाणांचे दर्शन घडवले आहे. हे प्रदर्शन १६ मेपर्यंत खुले असणार आहे. कुणालचे लहानपण कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात गेले. शिक्षणासाठी मुंबईत आल्यावर चित्रकलेच्या तासाला तो विविध चित्रे काढू लागला. मनाच्या कॅनव्हासवर लहानपणी उमटलेले रंग कागदावर उतरत गेले. काही चित्रांमुळे शिक्षकांना त्याच्यातील वेगळेपण जाणवले. त्यानंतर त्याला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळत गेले. आर्ट कॉलेजमध्ये शिकताना मुंबईतल्या विविध रस्ते, गल्ली-बोळांत फिरताना अनेक जागांनी तो भारावून गेला. प्रत्येक ठिकाणे त्याला नवीन होती. तो त्यांच्याकडे आकर्षित होत गेला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57938 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top