
दाभोळ ः बाजारात जे विकले जाते तेच पिकेल या धोरणाने काम करा
फोटो ओळी
-rat13p26.jpg- २१५७१ , दापोली ः मार्गदर्शन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
-rat13p27.jpg-२१५७२
प्रदर्शनाचे उद्घाटन करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी.
शेतकऱ्यांच्या व्यावहारिक
ज्ञानाशी विज्ञानाची सांगड घाला
राज्यपाल कोश्यारी; दापोलीत सुवर्णपालवी महोत्सवाचे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
दाभोळ, ता. १३ ः रत्नागिरी जिल्ह्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनेक योजना राबवल्या. प्रथम श्वेतक्रांती नंतर हरितक्रांती आणि आता निलक्रांती धोरण स्वीकारण्यात आले आहे. प्रत्यक्षात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडे व्यावहारिक ज्ञान मोठ्या प्रमाणावर आहे. विद्यापीठात शेतीविषयक विज्ञान व संशोधन आहे. या दोन्हीची सांगड घालण्याचा प्रयत्न या चार दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात व्हायला हवा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त सुवर्ण पालवी महोत्सव २०२२ चे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर विश्वेश्वरैया सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादाजी भुसे, भटके आणि विमुक्त व अर्ध भटक्या जातीजमाती कल्याण आणि विकास मंडळाचे अध्यक्ष दादा इदाते, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत उपस्थित होते.
मंत्री सामंत म्हणाले, जिल्ह्यात विद्यार्थ्यांना ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग्य वातावरण असावे, यासाठी अभ्यासिका उभारण्यात येत आहे. याचा वापर शेतीविज्ञान आणि संशोधन यासाठी होणार असेल तर अभ्यासिकाची इमारत विद्यापीठास देण्याची तयारी आहे.
मान्सून चांगला राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे आणि आताच्या स्थितीनुसार मान्सून लवकर येण्याचीही शक्यता आहे. या स्थितीत राज्यातील शेतकऱ्यांना गरजेनुसार खते आणि बियाणे पुरवण्यास शासन तयार आहे, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. सावंत यांनी विद्यापीठाची आतापर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील नियोजनाबाबत माहिती दिली.
चौकट
खासदारांची पाठ
सुवर्ण पालवी कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाला कोकणातील सिंधुदुर्गचे पालकमंत्री वगळता एकही पालकमंत्री उपस्थित नव्हते. तसेच कोकणातील एकही खासदार उपस्थित नव्हते. विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेतील सदस्य असलेले आमदार योगेश कदम व आमदार शेखर निकम सोडून सदस्य असलेले अन्य आमदार अनुपस्थित होते.
-
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57940 Txt Ratnagiri1
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..