चिपळूण-वृद्धावर कोयतीने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-वृद्धावर कोयतीने वार
चिपळूण-वृद्धावर कोयतीने वार

चिपळूण-वृद्धावर कोयतीने वार

sakal_logo
By

कचरा टाकण्यावरुन वृद्धावर कोयतीने वार


सावर्डेतील घटना; हातासह डोक्याला मार

चिपळूण, ता. १३ ः सावर्डे-कुंभारवाडी येथे कचरा टाकण्यावरुन झालेल्या वादावादीत वृद्धावर कोयतीने वार केल्याची घटना घडली आहे. ही घटना १२ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली. याची फिर्याद रामचंद्र चव्हाण (४९, कुंभारवाडी, सावर्डे) यांनी येथील पोलिस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामचंद्र चव्हाण हे कोयतीने नारळाच्या झावळयांचे हिर काढून कचरा टाकत होते. तेवढ्यात मारुती चव्हाण, महेश चव्हाण, रोहित चव्हाण (सर्व रा. सावर्डे-कुंभारवाडी) यांनी कचरा टाकायचा नाही, जमीन आमची आहे, असे म्हणत दमदाटी केली. मारुती चव्हाण हा कोयती घेवून अंगावर धावून गेला. याचवेळी महेश चव्हाण याने त्याच्या हातातील कोयती ओढून घेत रामचंद्र चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या तीन बोटांवर व डोक्यात मारुन जखमी केले. याची फिर्याद रामचंद्र चव्हाण यांनी दाखल केल्यानंतर मारुती, महेश, रोहित या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57941 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top