भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला मालवणात बालकावर हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला
मालवणात बालकावर हल्ला
भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला मालवणात बालकावर हल्ला

भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला मालवणात बालकावर हल्ला

sakal_logo
By

59428

भटक्या कुत्र्यांचा बालकावर हल्ला

मालवणातील घटना; स्थानिकांकडून बंदोबस्ताची मागणी

मालवण, ता. १३ : भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात पर्यटनासाठी आलेल्या पालघर येथील कुटुंबातील एक चार वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना आज दुपारी अडीचच्या दरम्यान बंदर जेटी परिसरातील एका हॉटेलगत घडली. जखमी मुलावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.
गेले काही दिवस पालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया तसेच लसीकरण करण्याची मोहीम राबविली जात आहे. पथकाकडून शहरातील, किनारपट्टी भागातील भटके कुत्रे पकडले जात आहेत. अशा परिस्थितीत आज येथील पर्यटनाचा आनंद लुटण्यास पालघर येथील घरात कुटुंब आले होते. पर्यटन झाल्यानंतर ते बंदर जेटी लगतच्या एका हॉटेलमध्ये जेवण करण्यास थांबले होते. याच दरम्यान अयान घरात हा ४ वर्षीय मुलगा गाडीपाशी उभा असताना तेथील तीन ते चार कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. यात त्या मुलाच्या पाठीवर कुत्र्यांनी नखे लावल्याने तो जखमी झाला. घरत कुटुंबीयांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या मुलाला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मुलावर उपचार करून घरी पाठविले.
---------
चौकट
लक्ष देणे गरजेचे
पालिकेची कुत्रे पकडण्याची मोहीम सुरू आहे. अनेक ठिकाणचे कुत्रे पकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया तसेच लसीकरण केले जात आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा विचार करत कुत्रे पकडणाऱ्या पथकाने पर्यटन स्थळांच्या परिसरातील भटके कुत्रे पकडण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57947 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top