गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान
गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान

गणपतीपुळेत बुडणाऱ्या इचलकरंजीच्या तिघांना जीवदान

sakal_logo
By

गणपतीपुळेत बुडणाऱ्या तिघांना जीवदान
स्पीड बोट चालकांचे प्रसंगावधान; जीवरक्षकाअभावी पर्यटक असुरक्षित
रत्नागिरी, ता. १३ ः तालुक्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळ गणपतीपुळेत समुद्रात पोहणार्‍या तिन पर्यटकांना मोरया स्पोटर्स् स्पीड बोट चालकांनी बुडताना वाचवले. तिन्ही पर्यटक इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील असून हा प्रकार सायंकाळी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास घडला. जीवरक्षकाअभावी येथील किनाऱ्यावर येणारे पर्यटक असुरक्षित मानले जात आहेत.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या असनी चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरील वातावरण बदलले असुन समुद्र खवळलेला आहे. शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी गणपतीपुळे येथील समुद्रात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास विकास जाधव (वय ४६), संजना जाधव (वय ४०), अंचल करंजे (वय २१, सर्व रा. इंचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर) हे देवदर्शन करून गणपतीपुळे समुद्रात आंघोळ करण्यासाठी उतरले होते. समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे लाटेसोबत खोल पाण्यात ओढले गेले. पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते खोल पाण्यात जाऊ लागले. पाण्याला असलेला करंट आणि वेगवान लाटांमुळं त्यांना माघारी किनाऱ्यावरही येता येत नव्हते. ते बुडत असल्याचे लक्षात आल्यानंतर किनाऱ्यावर गोंधळ सुरु झाला. पाण्यात बुडत असताना किनाऱ्यावरील मोरया वॉटर स्पोर्ट्सचे सदस्यांनी स्पीड बोटीच्या मदतीने त्वरीत बुडणाऱ्या व्यक्तींना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले. लाटांमुळे स्पीडबोट चालकांनाही बुडणाऱ्यांपर्यंत पोचण्यात अडथळा येत होता. हा प्रकार समजल्यानंतर गणपतीपुळे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार मधुकर सलगर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. समुद्राच्या पाण्याचा प्रवाह बदलत असून पाण्याला करंट आहे. पर्यटकांनीही समुद्रातील भरती-ओहोटीची माहिती घेऊन समुद्रात आंघोळीसाठी जावे असे आवाहन जयगड पोलिस, किनाऱ्यावरील व्यावसायिकांकडून केले आहे.
---
चौकट
चाळ बनण्याची जागा बदलतेय?
समुद्र खवळला असून या परिसरात मोठे खड्डे तयार झाले आहेत. वाळूमध्ये पाय स्थिर राहत असून समुद्राच्या दिशेने आपसूकच वाळू सरकते. पुर्वी गणपती मंदिरासमोर अशा प्रकारचा चाळ तयार होत होता. प्रवाह बदलत असल्यामुळे चाळ तयार होण्याची जागाही बदलली असावी असा अंदाज किनार्‍यावरील जुन्या लोकांकडून वर्तविली जात आहे.
---
कोट
समुद्र खवळलेला असून लाटांचा वेग वाढल्याने त्यात पोहणे जिकीरीचे आहे. किनारी भागात खड्डे पडले असून वाळू वेगाने सरकत आहे.
- किसन जाधव, व्यावसायिक

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57954 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top