कुंभवडे येथील मंदिरात देव खंडेश्वराची प्रतिष्ठापना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभवडे येथील मंदिरात
देव खंडेश्वराची प्रतिष्ठापना
कुंभवडे येथील मंदिरात देव खंडेश्वराची प्रतिष्ठापना

कुंभवडे येथील मंदिरात देव खंडेश्वराची प्रतिष्ठापना

sakal_logo
By

21633
कुंभवडे ः श्री देव खंडेश्वराची मूर्ती.


कुंभवडेत देव खंडेश्वराची प्रतिष्ठापना

विविध धर्मिक कार्यक्रम; फणसाच्या लाकडाची देखणी मूर्ती


सकाळ वृत्तसेवा
आंबोली, ता. १३ : कुंभवडे येथे श्री देव खंडेश्वर मूर्तीची आज सकाळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तीन दिवस हा सोहळा झाला.
कुंभवडे येथे बुधवारी (ता.११) वाजतगाजत मिरवणुकीने श्री देव श्रीखंडेश्वरची मूर्ती आणण्यात आली. ही मूर्ती परंपरेनुसार झोळंबे येथे बनवण्यात आली होती. पूर्ण फणसाच्या लाकडापासून बनवलेल्या या देखण्या मूर्तीचे गावात उत्साहात स्वागत झाले. यानिमित्त तीन दिवस श्री गणेश पूजन, गंगापूजन असे विविध धार्मिक कार्यक्रम पुरोहितांच्या आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आज मुख्य सोहळा होता. पुरोहित आणि शिमधडे आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी सोहळा करण्यात आला. इतर सातेरी भावई देवी प्राण प्रतिष्ठापना, शिवलिंग तसेच म्हारिंगण व सर्व देवदेवतांची पुनः प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी चौकूळ, खडपडे, आंबोली, इसापूर शिमधडे तसेच गावातील पै पाहुणे आणि आजूबाजूच्या गावातील लोक, माहेरवाशिणी मुली तसेच सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57962 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top