
जामसंडेत विकासकांना प्रारंभ जामसंडेत भुमिपूजने
21635
जामसंडे ः येथे विकासकामांना प्रारंभ करताना हर्षा ठाकूर. शेजारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू आदी.
जामसंडेत विकासकांना प्रारंभ
देवगड, ता. १३ ः जामसंडे येथील प्रभाग क्रमांक १४ मधील विविध विकासकामांचे भुमिपुजन झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळणार असल्याची माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली. माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्या हस्ते कामांचे भुमिपुजन करण्यात आले.
पालकमंत्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध दिल्याबद्दल शिवसेना पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, यातील रानडे कॉलनी मुख्य रस्ता व अंतर्गत पोट रस्ते खडीकरण व डांबरीकरण, पौर्णिमा लॉज ते भिडे आंबा बाग रस्ता खडीकरण व डांबरीकरण ही दोन कामे पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित चार कामांसाठी प्रशासकीय मंजुरी मिळालेली आहे. यामध्ये नाचणकर घर ते चौगुले घरापर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, प्रभाकर भुजबळ ते ओहोळपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, गणेशनगर मुख्य रस्ता व अंतर्गत पोटरस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे, धोपटेवाडी मुख्य रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे आदी कामांचा समावेश आहे. यातील कामांचे भुमिपुजन माजी नगरसेविका हर्षा ठाकूर यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, अण्णा खवळे आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y57965 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..