सावंतवाडीत २२ ला गझल मैफल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावंतवाडीत २२ ला गझल मैफल
सावंतवाडीत २२ ला गझल मैफल

सावंतवाडीत २२ ला गझल मैफल

sakal_logo
By

सावंतवाडीत २२ ला गझल मैफल
सावंतवाडी ः ओंकार भजन मंडळ सावंतवाडी व गझल सागर प्रतिष्ठान यांच्यावतीने गझलनवाज पं. भीमराव पांचाळे यांच्या ‘एक जखम सुगंधी’ गझल मैफलीचे आयोजन २२ मे रोजी सायंकाळी पाचला येथील आरपीडी हायस्कूल येथे केले आहे. (स्व.) दशरथ सगम, (स्व.) मधुकर पास्ते या दोन गुणवंत गायकांच्या स्मृतीप्रित्यर्थ या मैफलींचे आयोजन केले आहे. दशरथ सगम हे गझलेवर निस्सीम प्रेम करणारे गायक होते. गझल संमेलनात गझलगायन सादर करून ते दाद मिळवायचे. मधुकर पास्ते भजनी बुवा होते. अनेक शिष्यही त्यांनी घडविले. दोघांच्याही कलाविषयक सेवेला उजाळा देण्यासाठी या मैफिलीचे आयोजन केले आहे. कोरोनामुळे गझलनवाज भीमराव पांचाळे यांची मैफिल जिल्ह्यात गेली दोन वर्षे होऊ शकली नव्हती. साहजिकच जिल्हावासीयांना त्यांच्या मैफलीचा लाभ घेण्याची संधी प्राप्त झाली आहे. गझलप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप वाडकर यांनी केले आहे.
-----------
मळगावात विहीर दुरुस्तीस प्रारंभ
सावंतवाडी ः कित्येक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या विहिरीचे काम मार्गी लागल्याने पाणी टंचाईची समस्या व उन्हाळ्यात करावी लागणारी पाण्यासाठीची वणवण संपणार आहे, असे मत मळगाव-तेलकाटे ग्रामस्थांनी व्यक्त केले. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून मळगाव-तेलकाटेवाडी येथील सार्वजनिक विहीर दुरुस्ती कामाचा शुभारंभ करण्यात आला. मळगाव सरपंच स्नेहल जामदार व उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या विहीर दुरुस्ती कामाचा शुभारंभ वॉर्ड सदस्या निकिता बुगडे यांच्या हस्ते झाला. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रत्नप्रभा तळकटकर, गणेशप्रसाद पेडणेकर, उदय जामदार उपस्थित होते.
------------
परुळे केंद्रशाळेत ‘शाळा पूर्वतयारी’
परुळे ः जिल्हा परिषद केंद्रशाळा क्रमांक ३ येथे शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात झाला. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांना शाळेची गोडी लागावी व सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळावा, या हेतूने या मेळाव्यात कार्यक्रम घेण्यात आले. परुळेबाजार सरपंच श्वेता चव्हाण, उपसरपंच मनीषा नेवाळकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील चव्हाण, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विलास गवंडे, उपाध्यक्षा सानिका परुळेकर, हनुमंत तेली, मुख्याध्यापक समीर चव्हाण, शिक्षक व पालक उपस्थित होते. यानिमित्त प्रभात फेरी काढण्यात आली.
---
तुळसला आज धार्मिक कार्यक्रम
वेंगर्ले ः तुळस-खरीवाडा येथील श्री देव वेताळ मंदिरामध्ये उद्या (ता. १५) सकाळी नऊला धार्मिक कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने आरती, तीर्थप्रसाद, भजन व रात्री दहाला गो. ग. पारखी लिखित ‘डबलक्रॉस’ हे तीन अंकी नाटक सादर होणार आहे. नाट्यरसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58069 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top