पोलिस कर्मचारी असोसिएशनची १७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस कर्मचारी असोसिएशनची १७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा
पोलिस कर्मचारी असोसिएशनची १७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा

पोलिस कर्मचारी असोसिएशनची १७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा

sakal_logo
By

पोलिस कर्मचारी असोसिएशनची
१७ ला वार्षिक सर्वसाधारण सभा
कणकवली ः निवृत्त पोलिस अधिकारी कर्मचारी असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी (ता. १७) सकाळी अकराला पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्गच्या सभागृहात आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे मार्गदर्शन करणार आहेत. निवृत्त अधिकारी, पोलिस कर्मचारी तसेच मृत कर्मचा‍ऱ्यांच्या नातेवाईकांनी सभेला उपस्थित राहावे. ज्या निवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या काही समस्या असतील, तर त्यांनी आगावू व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर पाठवाव्यात. त्याचप्रमाणे मागील सभेत जे मुद्दे उपस्थित केले होते, त्यांची पूर्तता झालेली नसल्यास तेही या ग्रुपवर कळवावे. ज्यांच्याकडे व्हॉटस्अ‍ॅप नाही, त्यांनी सहकाऱ्यांमार्फत अथवा लेखी स्वरुपात आगावू पोहोचतील असे पाठवावेत, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष अर्जुन राणे यांनी केले आहे.
------------
मसुरेत आज विविध कार्यक्रम
मालवण ः गडघेरावाडी येथील दत्त मंदिरच्या वर्धापन दिनानिमित्त उद्या (ता. १५) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी साडेआठला अभिषेक, धार्मिक कार्यक्रम, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी एकपासून महाप्रसाद, सायंकाळी सातला महाआरती, रात्री नऊला दिंडी नृत्य होणार आहे. यात श्री देव गांगेश्वर भजन मंडळ, चिंदर-पालकरवाडीचे बुवा शिशिर पालकर, देवी भगवती भजन मंडळ, चिंदर-भटवाडीचे बुवा संदीप परब सहभागी होणार आहेत. उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
-------------
तुळसला ३० पासून जैतिर वार्षिकोत्सव
वेंगुर्ले ः दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, तुळस ग्रामदैवत श्री जैतिर देवाचा वार्षिक उत्सव ३० मेपासून सुरू होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. देवाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, रत्नागिरी, बेळगाव, सिंधुदुर्ग व नजीकच्या गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव मोठ्या प्रमाणात झाला नव्हता; मात्र कोरोना संसर्ग संपुष्टात आल्याने पूर्वीप्रमाणेच उत्सव होणार आहे. सलग ११ दिवस हा उत्सव चालेल.
---
सात ग्रामपंचायतींच्या निवडणुका
कणकवली ः सात ग्रामपंचायतींच्या रिक्त ११ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. चिंचवली, नांदगाव, वायंगणी, नडगिवेच्या प्रत्येकी एका जागेसाठी, ओझरमच्या तीन, बेळणे खुर्द व साळिस्तेच्या प्रत्येकी दोन जागांचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58070 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top