वेंगुर्लेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर करू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वेंगुर्लेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर करू
वेंगुर्लेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर करू

वेंगुर्लेत कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना लवकरच कामावर हजर करू

sakal_logo
By

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना
लवकरच कामावर हजर करू

वेंगुर्ले मुख्याधिकारी ः कामगार संघटनेला ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. १४ ः कंत्राटी कामगारांबाबत स्वतंत्र म्युनिसिपल कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर येत्या काही कालावधीत सफाई कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेण्याची ग्वाही मुख्याधिकारी डॉ. अमिकुमार सोंडगे यांनी दिली.
टेंडर संपल्याने २ मे रोजी येथील नगरपरिषदेने कंत्राटी कर्मचाऱ्यांना अचानक सफाई व इतर कर्मचाऱ्यांना काम बंद करण्यास सांगितले. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांनी प्रशासनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यात जे सफाई कामगार स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियनचे सदस्य होते, त्यांची बाजू उचलून धरून युनियनने नगरपरिषदेशी पत्रव्यवहार व चर्चा केली. यातून मार्ग काढण्यात यश मिळाले आहे. कर्मचारी संघटनेने व नगरपरिषदेने हा प्रश्न ताणून न धरता सफाई कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी सर्व मुद्यांवर चर्चा केली. यावेळी प्रशासकीय अधिकारी संगीता कुबल, म्युनिसिपल कामगार संघटनेचे अध्यक्ष अनिल वेंगुर्लेकर, जिल्हाध्यक्ष वामन कांबळे, सल्लागार वाय. जी. कदम, सदस्य पुंडलिक जाधव, अक्षय तेरेखोलकर, महिला प्रतिनिधी शुभांगी जाधव-नांदगावकर, मेघा जाधव, सीमा जाधव उपस्थित होते. झालेल्या चर्चेत संघटनेने प्रशासनाला नेहमी सहकार्य करण्याचे, तर येत्या काही दिवसांत सफाई कर्मचाऱ्यांना कामावर हजर करून घेण्याची ग्वाही मुख्याधिकारी डॉ. सोंडगे यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58072 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top