पाट हायस्कूलमध्ये समूह पखवाज वादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाट हायस्कूलमध्ये समूह पखवाज वादन
पाट हायस्कूलमध्ये समूह पखवाज वादन

पाट हायस्कूलमध्ये समूह पखवाज वादन

sakal_logo
By

21711
पाट ः येथील हायस्कूलमध्ये आयोजित पखवाज वादन.

पाट हायस्कूलमध्ये समूह पखवाज वादन
कुडाळ, ता. १४ ः एकनाथ ठाकूर कला अकादमीतर्फे पाट हायस्कूलमध्ये पखवाज वादन वर्ग सुरू असून, पंचक्रोशीतील ४० पखवाज वादकांचे समूह पखवाज वादनाचा कार्यक्रम पाट हायस्कूलच्या रंगमंचावर झाला. या शैक्षणिक वर्षातील हा शेवटचा कार्यक्रम असल्यामुळे उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी पखवाज वादक शिक्षक महेश सावंत, कलाशिक्षक संदीप साळसकर, मुख्याध्यापक शामराव कोरे, पर्यवेक्षक राजन हंजनकर, संस्था सेक्रेटरी दिगंबर सामंत, माजी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. हायस्कूलचा पखवाज विशारद राज कुंभार, ओंकार वेंगुर्लेकर यांचे कौतुक करण्यात आले. ‘शिवनाद मृदंग’ आणि ‘ओम नमः शिवाय’ पखवाज घोष करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. श्री. साळसकर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58073 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top