परिचारिका समाजाचा आधारस्तंभ ः जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परिचारिका समाजाचा आधारस्तंभ ः जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी
परिचारिका समाजाचा आधारस्तंभ ः जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी

परिचारिका समाजाचा आधारस्तंभ ः जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी

sakal_logo
By

21713
कुडाळ ः कोरोनाकाळात लोकसेवेचे भरीव काम केलेल्या परिचारिका विद्यार्थिनींना गौरविताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी. (छायाचित्र ः अजय सावंत)

परिचारिका समाजाचा आधारस्तंभ

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी ः परिचर्या दिनानिमित्त कुडाळात कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. १४ ः बॅ. नाथ पै शिक्षण संस्था ही समाजसेवेची एक प्रयोगशाळा आहे. जन्माला आलेल्या मुलाचा पहिला श्वास ते मृत्यूशय्येवर असलेल्या एखाद्या व्यक्तीचा शेवटचा श्वास यातील निरंतर सेवा म्हणजे परिचर्या. परिचर्या क्षेत्र हे केवळ व्यावसायिक क्षेत्र नसून ती सेवाभावी वृत्ती आहे. यात स्वतःचे अस्तित्व विसरून इतरांचे अस्तित्व जपावे लागते. म्हणूनच समाजासाठी परिचारिका हा एक फार मोठा आधारस्तंभ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले.
१२ मे या जागतिक परिचर्या दिनाचे औचित्य साधून येथील बॅ. नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च ॲकॅडमीमध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, शिक्षण संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमृता गाळवणकर, बॅ. नाथ पै कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्राचार्य सूरज शुक्ला, नर्सिंग कॉलेज उपप्राचार्य कल्पना भंडारी, प्राध्यापिका वैशाली ओटवणेकर. बॅ. नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज, नर्सिंग प्राचार्या शांभवी आजगावकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी म्हणाल्या, ‘‘मागील दोन वर्षांच्या कोरोनाकाळात बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेने आणि नर्सिंग विभागाने या जिल्ह्यासाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे. या कार्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आणि प्रशासन या संस्थेचे नेहमीच ऋणी राहतील. नर्सिंग महाविद्यालयातून पदवी घेतलेले विद्यार्थी सुद्धा आयएस, आयपीएस होऊ शकतात." यावेळी कोर्स ईरा ऑनलाइन प्रकारांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी पूजा म्हालटकर, रेश्मा कोचरेकर, प्रियांका माळकर, नेहा महाले तसेच प्रा. प्रथमेश हरमलकर, प्रसाद कानडे आदी उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून कोरोना कालखंडात बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ज्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले, त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उपप्राचार्या सौ. भंडारी यांनी परिचय केला. प्रा. वैशाली ओटवणेकर यांनी प्रस्तावना केली. सुमन करंगळे यांनी सूत्रसंचालन केले. गौतमी माईणकर यांनी आभार मानले.

संस्थेची सामाजिक बांधिलली
तहसीलदार म्हणाले, ‘‘नर्सिंग हा जरी व्यावसायिक अभ्यासक्रम असला, तरी हा दृष्टीकोन या संस्थेने बदललेला आहे. केवळ पैसा हाच केंद्रबिंदू न मानता संस्थेने मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करून ती जोपासली आणि याचीच प्रचिती कोरोना काळात सर्वांनाच झाली.’’

विश्वास प्रेरणास्त्रोत
उमेश गाळवणकर म्हणाले की, कोरोना काळात लोकांना सेवा पुरविताना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि पालकांनी संस्थेवर दाखविलेला विश्वास काम करण्यासाठी मुख्य प्रेरणास्रोत ठरला, असे सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58075 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top