‘साहित्य प्रेरणा’ची शुक्रवारी सभा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘साहित्य प्रेरणा’ची शुक्रवारी सभा
‘साहित्य प्रेरणा’ची शुक्रवारी सभा

‘साहित्य प्रेरणा’ची शुक्रवारी सभा

sakal_logo
By

‘साहित्य प्रेरणा’ची शुक्रवारी सभा
सावंतवाडी ः आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची एकोणिसावी सभा शुक्रवारी (ता.२०) सायंकाळी पाचला आजगाव वाचनालयात आयोजित केली आहे. या सभेत ‘माझे जीवन माझे वाचन’ या विषयावर माधुरी काकतकर-आठल्ये या विचार मांडणार आहेत. सौ. आठल्ये नवी मुंबईच्या रहिवासी असून, निवृत्त शिक्षिका आहेत. बालपणापासून ‘पुस्तक वाचन’ हा त्यांचा छंद आहे. त्यांच्या वैयक्तिक संग्रहात सुमारे पाचशे पुस्तके आहेत. अलीकडे त्या कविता, लेख असे लिखाण करतात. त्यांचे लिखाणही रसिकमान्य होत आहे. त्यांचे विचार ऐकण्यासाठी या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे
..............
नेमबाजी प्रशिक्षणाचे आयोजन
सावंतवाडी ः येथील उपरकर शूटिंग अकॅडमीच्यावतीने सावंतवाडी व वेंगुर्ले येथे पाच दिवसांचे नेमबाजी प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. सावंतवाडी, माठेवाडा येथील शूटिंग ॲकॅडमीमध्ये १७ ते २१ मे दरम्यान, तर वेंगुर्ले कॅम्प येथील ॲकॅडमीमध्ये २२ ते २६ मे या कालावधीत नेमबाजीचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शिबिरात दहा वर्षांवरील मुलं-मुली सहभागी होऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा शूटिंग असोसिएशनच्यावतीने केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58076 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top