
अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित
अंगणवाडीचे कर्मचारी
मानधनापासून वंचितच
परुळेकर ः शासनाच्या दुर्लक्षाबाबत टीका
कुडाळ, ता. १४ ः अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन झालेले नाही. पावसाळ्याची तयारी, मुलांचे शाळा प्रवेश, लग्नसराई आणि वाढती महागाई याला त्यांनी कसे तोंड द्यावे? सरकारला बाकीचे पैसे खर्च करता येतात; मात्र अंगणवाडीसाठी पैसा नाही का? असा संतप्त सवाल अंगणवाडी नेत्या कमल परुळेकर यांनी केला आहे.
श्रीमती परुळेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, यावर कहर म्हणजे, ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पगाराची खाती बॅंक ऑफिसात महाराष्ट्रभर आहेत, तिथेही तेच फेब्रुवारीचे मानधन खात्यात जमा झाले होते. ते लगेच परत गेले. एवढेच नाही, तर त्यांचा पूर्वीचा बॅलन्सही उडाला. सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यात खांबाळेची मदतनीस सायली चव्हाण हिचे फेब्रुवारीचे मानधन तिच्या खात्यात जमा झाले व तिचा आधीचा बॅलन्स ६०० रुपयेही खात्यातून डिलिट झाला. हेच नागपुरात उमा रामटेके यांचे झाले. चौकशी केली असता, बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या सर्व्हरला प्रॉब्लेम झाल्याचे सांगतात. आमचे महिला व बाल कल्याण खाते बोट दाखवून खुशाल झोपा काढते आहे. याला काय म्हणावे, हेच कळत नाही. आता सरकारवर विश्वास ठेवावा, खात्यावर की बॅंकेवर? असाही प्रश्न त्यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58077 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..