अल्पसंख्यांक समितीवर अशासकीय सदस्य नेमा अशासकीय सदस्य नेमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पसंख्यांक समितीवर अशासकीय सदस्य नेमा
अशासकीय सदस्य नेमा
अल्पसंख्यांक समितीवर अशासकीय सदस्य नेमा अशासकीय सदस्य नेमा

अल्पसंख्यांक समितीवर अशासकीय सदस्य नेमा अशासकीय सदस्य नेमा

sakal_logo
By

21714
कुडाळ ः शशांक बर्वे यांचे स्वागत करताना बाबा खतीब, नाझीर शेख.

अल्पसंख्यांक समितीवर
अशासकीय सदस्य नेमा

बाबा खतीब ः शशांक बर्वे यांना निवेदन

साटेली भेडशी, ता. १४ ः अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्याची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँगेसच्या अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष बाबा खतीब यांनी मंत्रालयीन अल्पसंख्याक विभागाचे सचिव शशांक बर्वे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात श्री. खतीब यांनी म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८ पासून अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली नाही. या समितीच्या सभाही वर्षभर होत नाहीत. त्यामुळे अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासावर परिणाम होऊन त्यांचा विकास खुंटला आहे. या समितीवर अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन २३ डिसेंबर २०२० पर्यंत प्राप्त होतील, असे अर्ज मागविले होते. प्राप्त अर्ज पत्र १८ जून २०२१ ला आपल्याकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत. आपल्याकडून आजपर्यंत मंजुरी प्रलंबित आहे. जिल्ह्यात अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातील अनेक विकासकामे आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्याही थांबल्या आहेत. त्यामुळे समाजात नाराजी आहे. अल्पसंख्यांकांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष देऊन जिल्ह्यातील अल्पसंख्यांक कल्याण समितीवर अशासकीय सदस्यांच्या नेमणुकीचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी श्री. खतीब यांनी केली आहे. यावेळी नाझीर शेख उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58078 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top