पिंगुळीचे रवळनाथ मंडळ भजनात प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंगुळीचे रवळनाथ मंडळ भजनात प्रथम
पिंगुळीचे रवळनाथ मंडळ भजनात प्रथम

पिंगुळीचे रवळनाथ मंडळ भजनात प्रथम

sakal_logo
By

21715
सरमळे ः प्रथम क्रमांक प्राप्त रवळनाथ भजन मंडळाला गौरविताना अर्जुन गावडे, विनायक दळवी, दादा परब, प्रकाश चिले, सोनू दळवी आदी.

पिंगुळीचे रवळनाथ मंडळ भजनात प्रथम

सरमळेतील स्पर्धा; बिबवणेचे ‘गिरोबा प्रासादिक’ द्वितीय

ओटवणे, ता. १४ ः सरमळे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत पिंगुळी येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने प्रथम, बिबवणे येथील गिरोबा प्रासादिक भजन मंडळाने द्वितीय, तर पाडलोस येथील रवळनाथ प्रासादिक भजन मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला.
श्री देवी सातेरी भगवती कला-क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ, सरमळे यांच्यावतीने जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती. स्पर्धेचे उद्‍घाटन स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष संतोष कानसे, सगुण नाईक, सरपंच रुचिता सावंत, उपसरपंच समीर माधव, भाग्यलक्ष्मी गावडे, मंडळाचे अध्यक्ष समीर गावडे, उपाध्यक्ष संजय गावडे, सचिव रवींद्र सावंत, सहसचिव मंगेश सावंत, खजिनदार सागर गावडे, सहखजिनदार मुकुंद गावडे, नाना गावडे, दीपांकर गावडे, अविनाश गावडे यांच्या उपस्थितीत झाले. सरमळेचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी भगवती मंदिरात झालेल्या या भजन स्पर्धेत जिल्ह्यातील ११ भजन संघ सहभागी झाले.
उर्वरित निकाल असा ः उत्तेजनार्थ प्रथम-गोठण देव प्रासादिक (वजराठ), द्वितीय सनामदेव प्रासादिक (सांगेली), तृतीय सद्गुरुनाथ प्रासादिक (तुळस), विशेष पारितोषिक रावजी दळवी (श्री माऊली मूळपुरुष ब्राह्मणमाय भजन मंडळ (विलवडे), उत्कृष्ट गायक-गौरेश चव्हाण (स्वरसाधना प्रासादिक भजन मंडळ डिगस), पखवाज वादक-ऋषिकेश वेंगुर्लेकर (गोठण प्रासादिक भजन मंडळ वजराट), तबलावादक-ओमकार तळवणेकर (सनामदेव प्रासादिक भजन मंडळ (सांगेली), कोरस-जन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल, चकवी-रोहन सावंत (सद्गुरु साटम महाराज प्रासादिक, निरवडे), शिस्तबद्ध संघ-गिरोबा प्रसादिक (बिबवणे), उत्कृष्ठ महिला श्रोता-स्वाती सावंत (सरमळे), पुरुष-प्रकाश गवस (कोनशी) यांना गौरविण्यात आले.
माजी उपसभापती विनायक दळवी, अर्जुन गावडे, मंगेश सावंत, सोनू दळवी, परीक्षक प्रकाश चिले, पखवाज विशारद डॉ. दादा परब, गंगाराम गावडे, विठ्ठल गावडे, विजय गावडे आदींच्या उपस्थितीत बक्षीस वितरण झाले.

बक्षिसे अशी...
प्रथम तीन क्रमांक पटकावलेल्या मंडळांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार, पाच हजार, उत्तेजनार्थ प्रथम तीन क्रमांकांना प्रत्येकी १००० रुपये, उत्कृष्ट गायक, पखवाज वादक, तबला वादक, हार्मोनियम वादक, कोरस, चकवी वादक, शिस्तबद्ध संघ यांना प्रत्येकी ५०० रुपयांचे पारितोषिक, सन्मानचिन्ह दिले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58079 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top