
कोरोनानंतर प्रथमच भेटले वर्गमित्र
21716
वसोली ः सायन्स लॅबचे उद्घाटन करताना चेअरमन श्रीकृष्ण परब. सोबत मुख्याध्यापक अजित परब, दीपक तारी, प्रसाद परब, आनंद गुंजाळ, शांताराम कडव, भाई रेमळकर आदी.
कोरोनानंतर प्रथमच भेटले वर्गमित्र
तिसरा स्नेहमेळा ः वसोली हायस्कूलचे माजी विद्यार्थी
सावंतवाडी, ता. १४ ः वसोली (ता. कुडाळ) येथील यशवंत राघोजी परब विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा झाला नव्हता. कोरोनामुक्तीची घोषणा झाल्यानंतर भेटीची आस लागलेल्या मित्र परिवाराची अखेर १२ मे रोजी झालेल्या स्नेहमेळाव्यात भेट झाली.
माजी विद्यार्थ्यांचा हा तिसरा स्नेहमेळावा शाळा समिती चेअरमन श्रीकृष्ण परब यांच्या अध्यक्षतेखाली वसोली विद्यालयात झाला. यावेळी मुख्याध्यापक अजित परब, शिक्षक दीपक तारी, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रसाद परब, सचिव रवींद्र कडव, एकनाथ कुर्लेकर व माजी सैनिक शांताराम कडव आदी उपस्थित होते. कोकण एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष दत्ता पाटील व वसोली हायस्कूलचे माजी चेअरमन यशवंत परब यांना आदरांजली वाहिली. माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव कडव यांनी स्वागत केले. यावेळी विविध क्षेत्रामध्ये यश संपादन केलेल्या विद्यालयातील माजी विद्यार्थी गौरेश लांबर, प्रियांका सरमळकर, प्रसाद परब, संदेश कडव, रवींद्र कडव, आनंद गुंजाळ यांच्यासह चेअरमन श्री. परब, मुख्याध्यापक श्री. परब व शिक्षक श्री. तारी आदींचा सत्कार करण्यात आला. सायन्स लॅब व स्मार्ट टीव्हीचे उद्घाटन झाले. यावेळी प्राथमिक शिक्षक एकनाथ कुर्लेकर, श्रीमती सरमळकर, श्री. कडव, श्री. गुंजाळ, श्री. राऊळ, श्री. परब, श्री. लांबर यांनी स्नेहमेळाव्याविषयी मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक श्री. परब, श्री. तारी तसेच पालक बाबाजी शेडगे यांनी मार्गदर्शन केले. श्री. कडव यांनी सूत्रसंचालन केले. श्री. परब यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58080 Txt Sindhudurg
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..