सोनाळी सोसायटी अध्यक्षपदी संजय साळसकर बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनाळी सोसायटी अध्यक्षपदी संजय साळसकर बिनविरोध
सोनाळी सोसायटी अध्यक्षपदी संजय साळसकर बिनविरोध

सोनाळी सोसायटी अध्यक्षपदी संजय साळसकर बिनविरोध

sakal_logo
By

सोनाळी येथील सोसायटी
अध्यक्षपदी संजय साळसकर

वैभववाडी, ता. १४ ः सोनाळी येथील ग्रामसेवा विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी भाजपचे संजय साळसकर, तर व्हाईस चेअरमनपदी समाधान जाधव यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर माजी सभापती व भाजप पदाधिकारी अरविंद रावराणे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
सोनाळी सोसायटीच्या संचालक पदासाठी नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप १० व शिवसेना ३, असे संचालक निवडून आले होते. आज चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक सोनाळी येथे पार पडली. या पदांसाठी भाजपकडून संजय साळसकर यांनी चेअरमन पदासाठी अर्ज दाखल केला. तर व्हाईस चेअरमन पदासाठी समाधान जाधव यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संचालक अरविंद रावराणे, प्रशांत पवार, सचिन कोदे, समाधान जाधव, प्रकाश शेलार, शीतल गुरव, शारदा तळेकर, प्रवीण भोसले, रवींद्र चव्हाण तसेच सरपंच भिमराव भोसले, संचालक अशोक रावराणे, संदीप शिंदे, विश्वनाथ पवार, ग्रामस्थ संतोष सावंत, सखाराम पार्टे, प्रकाश साळसकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58091 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top