रत्नागिरीत पेंट विथ मी कार्यशाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरीत पेंट विथ मी कार्यशाळा
रत्नागिरीत पेंट विथ मी कार्यशाळा

रत्नागिरीत पेंट विथ मी कार्यशाळा

sakal_logo
By

रत्नागिरीत पेंट विथ मी कार्यशाळा
रत्नागिरी ः देशातील आणि परदेशातील 13 चित्रप्रदर्शनात आपल्या चित्रांचे प्रदर्शन आणि चित्रशैलीचे प्रात्यक्षिक देणाऱ्या येथील डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी रत्नागिरीतील शिवाजीनगर येथे पेंट विथ मी आर्ट कार्यशाळा आयोजित केली आहे. ही कार्यशाळा 20 ते 21 मे आणि 27 व 28 मे या दिवशी सायंकाळी चार ते सहा या वेळात घेतली जाणार आहे. कार्यशाळेत पेंटिंगची विविध माध्यमे व साधने, शेडिंग, चारकोल आणि पेन्सिल ड्रॉईंगबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थींना कॅन्व्हासवर पेंटिंग करण्यासही शिकवले जाणार आहे. या कार्यशाळेत आठ वर्षावरील व इतर व्यक्तीही सहभागी होऊ शकतात. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना पेंटिंगविषयीची अधिक माहिती देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी डॉ. स्वप्नजा मोहिते यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-------
स्वयंसेवी संस्था व व्यक्तींसाठी पुरस्कार
रत्नागिरी ः समाजकल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते २०१९-२० व २०२११-२२ या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास, शाहू-फुले-आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायप्राविण्य पुरस्कार असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारासाठी संबंधित व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांनी आपले अर्ज व अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, रत्नागिरी सामाजिक न्यायभवन कुवारबाव यांच्या कार्यालयात संपर्क साधावा. अंतिम तारीख १५ मे पर्यंत आहे.
-----
चिपळूण रोटरीतर्फे आज
मोफत कृत्रिम अवयवदान शिबिर
चिपळूण ः रोटरी क्लब चिपळूण, रोटरी क्लब इचलकरंजी, टेक्सटाईल सिटी इचलकरंजी व साधू वासवाणी मिशन पुणे यांच्यावतीने चिपळुणात मोफत कृत्रिम पाय व हात शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिर १५ मे रोजी ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात होणार आहे. त्यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. शिबिरात अद्ययावत टेक्नॉलॉजीद्वारे फायबरपासून बनवलेले हलके व मजबूत आर्टिफिशियल कृत्रिम हात व पाय मोफत देण्यात येणार आहेत. दिव्यांग बांधवांना याचा लाभ घेता येणार आहे. हे आर्टिफिशियल हात व पाय लावल्यानंतर चालणे, सायकल चालवणे, चढ-उतार करणे व दैनंदिन कामे करू शकता येतात. शिबिराच्या दिवशी हाताची व पायाची मापे घेतली जाणार आहेत. महिनाभरानंतर हे अवयवांचे वाटप केले जाणार आहे. रविवारी सकाळी ९. ३० ते दुपारी १ वाजेपर्यंत ब्राह्मण सहाय्यक संघ सभागृहात दिव्यांगांची मापे घेतली जाणार आहेत. त्यानंतर मोफत कृत्रिम हात, पाय देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रसाद सागवेकर, अविनाश पालशेतकर, दिनकर पवार यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y58094 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top